मुंबई - अयोध्या (Ayodhya ) येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिरात (Ram Temple) आज प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या एकुणातच सोहळ्यात संपूर्ण देशातील नागरिक सहभागी झाले होते.
आजच्या या सोहळ्याची दृश्ये सर्वानीच घरबसल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने याची देही याची डोळा पहिली.. या तंत्रज्ञानाने रामचे दर्शन तर दिले पण आजच्या युगात ज्या प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटी देखील देऊ शकत नाही अशा प्रश्नांची उत्तरे रामाकडून तरी मिळतील?
याविषयी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील (Dnyan Prabodhini school) सायकॉलॉजी विभागाच्या प्रमुख, (Psychology department Head ) सायकॉलॉजिस्ट अस्मिता इनामदार- बारसावडे म्हणतात, रामायणात कोणतेही चमत्कार किंवा असंभव गोष्टींचा संदर्भ नाही.
संपूर्ण रामायण हे 'ह्युमन बिहेवियर' (Human behavior) म्हणजे माणसांच्या स्वभाव आणि वर्तुणुकीवर आधारलेले आहे. त्यामुळे अर्थातच त्याचा आताच्या घटनांशी देखील संबंध जोडला जाऊ शकतोच. रामायण हे आदर्श आहे तर महाभारत हे वास्तव आहे.
तर याबाबत फर्ग्युसन महाविद्यालयातील (Fergusson college ) संस्कृत विभागाचे (Sanskrit department) प्रमुख डॉ.अंकित रावल म्हणतात, आपण ज्याप्रमाणे जगलो त्याचप्रमाणे रामायणातील सगळी पात्र जगत होती, येणाऱ्या प्रश्नांना तोंड देत होती.
ती कुठेही आपले कर्तव्य सोडून किंवा सगळ्याचा त्याग करून हिमालयात गेलेली नव्हती. त्यामुळे ते जगात असताना त्यांनी दाखवलेला संयम, धर्मपरायणता ही आजच्या काळात देखील तितकीच 'रॅलेटिव्ह' आहे असे नक्कीच म्हणता येईल.
(Where was Lord Ram actually born?)
अस्मिता इनामदार म्हणतात, आताच्या काळात 'रिलेशन' हा खूप गुंतागुंतीचा आणि अनेकांसमोरचा मुख्य प्रश्न आहे. रामायणातील राम या माणसांच्या वर्तणुकीतील सर्वात चांगले उदाहरण म्हणून सांगता येईल.
जी माणसं या गोष्टींवर मनापासून श्रद्धा ठेवतात त्यांना नक्कीच मानसिकरित्या रामायणातील नाती जपणारी उदाहरणे एक 'आयडियल' उदाहरण म्हणून घेता येईल.
यामध्ये आदर्श नात्यात केवळ राम आणि सीता (Ram and Sita) नाही तर रामाचं अहल्या यांच्याशी असलेलं नातं, शबरी, लक्ष्मण यांचे नाते, नात्यातला संयमीपणा या गोष्टी रामायणातून शिकण्यासारख्या आहेत.
डॉ. रावल म्हणतात, आजच्या काळात नात्यांबाबत आपण खूप बोलतो. खूप अभिव्यती केली जाते, प्रत्यक्षात ते पाळलं जातंच असं नाही. याउलट रामायणात राम एका ठिकाणी म्हणतो,
लक्ष्मणः मे बहिश्चराः प्राणाः। याचा अर्थ माझे बाहेर फिरणारे प्राण म्हणजे लक्ष्मण आहेत.
आणि हेच ते जगतात देखील. कारण जेव्हा लक्ष्मण प्राण सोडतात तेव्हा रामही प्राण सोडतात. तर भरत देखील म्हणतात की, न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः। म्हणजेच "ते राष्ट्र राष्ट्र नाही ज्याचा राजा राम नाही." यातून राम आणि भरत यांच्यातील नातेसंबंध देखील स्पष्ट होतात.
(Ramayana gives today's problem solution)
एका रामाच्या आयुष्यात काय काय घडत नाही जिथे त्यांना नैराश्यात जाणे, राग अनावर होऊन उलटसुलट गोष्टी करणे स्वाभाविक होते. पण तसे झाले नाही.
आज नोकरीत एखादी गोष्ट वाईट झाली तरीही टोकाची पाऊले उचलणारी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.
इथे मात्र कायमच संयमी असणारा राम, तितकीच संयमी, शांत सीता, लक्ष्मण अशी सगळीच पात्र आहेत, जी पात्र खरं तर आजच्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण करू शकतात.
रामायणात एक क्षण असा आलेला दिसतो जिथे राम सीतेसाठी व्याकुळ होतानाच क्षण आहे. मात्र तरीही कुठेही संयम सुटून चुकीचे पाऊल उचलल्याचा दाखला नाहीच असेही इनामदार सांगतात.
(what are the lessons learn from Ramayana?)
आताच्या पिढीसमोर अनेक मोठमोठाली आव्हाने आहेत. यामध्ये पैसे, शिक्षण आरोग्य अशी अनेक प्रकारची आव्हाने आहेत.
रामायणातील रामासमोर पावलापावलावर आव्हाने आली. सर्वात मोठे आव्हान हे बलाढ्य रावणाला हरवणे होते.
विजेतव्या लङ्का चरणतरणीयो जलनिधिः
विपक्ष: पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपय: ||
तथाप्येको राम:सकलमवधीद्राक्षसकुलम् | क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे ||
अर्थ : प्रभु श्रीराम यांनी रावणाला हरविण्यासाठी समुद्र पार केला. त्यांचा शत्रू हा शक्तिशाली होता आणि त्यांच्याकडे वानर सैनिक होते.
त्यांना माहित होते की परिस्थिती गंभीर आहे मात्र त्यांनी आपल्याकडे किती साधने आहेत याहीपेक्षा स्वतःतील शक्तीवर विश्वास ठेवला.
स्वतःवरचा शक्तीने रामाने मोठे आव्हान देखील तितक्याच योग्य पद्धतीने पार पडले आणि आपल्या पत्नीला रावणाच्या तावडीतून वाचविले आहे त्यामुळे राम परिस्थिती अनुकूल नसतानाही स्वतःवर विश्वास ठेऊन जिंकणारा राम हा आदर्श ठरत असल्याचे डॉ.रावल सांगतात.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून रामायणात घडलेल्या अनेक घटनांचा आपण संदर्भ वापरू शकतो. अनेक मानसशास्त्रीय मॉडेल्स ही पाश्चात्य असल्याने प्रयोगही तिथल्याच व्यक्ती आणि उदाहरणांच्या अनुषंगाने झालेले असतात.
मात्र मानसशास्त्रात ज्यांची श्रद्धा आहे, जे हीच उदाहरणे पाहत लहानाचे मोठे झालेली माणसे आहेत अशी रामायणातील घटनांची उदाहरणे आपण मानसशास्त्रीय समस्या सोडविण्यासाठी वापरली तर नक्कीच ती प्रभावी ठरू शकतात असे अस्मिता इनामदार म्हणतात.
-------------
(Latest Marathi news article about Ramayana)
(Marathi news about ram, Ramlalla, Ram seeta )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.