छोट्याश्या मुंग्या जेव्हा सिंहांना त्यांची शिकारीची पद्धत बदलायला भाग पाडतात..

शास्त्रज्ञ म्हणतात.. जगात जेव्हा अनेकदा खूप मोठे मोठे बदल घडतात त्यावेळी त्या बदलांमागे अनेकदा छोटे छोटे जीव किंवा प्राणी कारणीभूत असतात.
lion and ant story
lion and ant storyesakal
Updated on

मुंबई: शास्त्रज्ञ म्हणतात... जगात जेव्हा अनेकदा खूप मोठे मोठे बदल घडतात त्यावेळी त्या बदलांमागे अनेकदा छोटे छोटे जीव किंवा प्राणी कारणीभूत असतात.

याचं ताजं उदाहरण नुकतंच सगळ्या जगणे पाहिलं आहे. कोरोनाच्या एका छोट्या व्हायरसने सगळ्या जगाला हादरवून सोडलं होतं.

आता आफ्रिकेच्या जंगलात देखील असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. छोट्याश्या मुंग्यांनी बलाढ्य जंगलाचा राजा म्हणविल्या जाणाऱ्या सिंहाला शिकार करण्याची पद्धत बदलायला भाग पाडले आहे.

वरकरणी पाहता हा छोटा बदल वाटत असला तरीही यामुळे जंगलातील नैसर्गिक अधिवासावर मोठा परिमाण होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासक वर्तवत आहेत.

(Eco system news in Marathi)

lion and ant story
Environment : नवीन वर्षात तुमची पर्यावरणीय जबाबदारी काय?

या संदर्भातील अभ्यास सायन्स जर्नलमध्ये (Science journal) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. आफ्रिका खंडातील केनिया देशातील फ्लोरिडा या विद्यापीठातील प्राध्यापक टॉड पाल्मर हे या संशोधन अभ्यासातील प्रमुख सहअभ्यासक आहेत.

'द गार्डियन' ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "या संशोधनातून समोर आलेल्या माहितीने आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत.

स्थानिक मुंग्याच्या अधिवासात नव्याने आलेल्या मुंग्यांनी केलेले परिणाम, त्यातून त्यांचं झाडांशी असणारं नातं आणि त्यातून प्राण्यांच्या शिकारीवर होणारा परिणाम इथपर्यंत पोहोचले आहे."

या अभ्यासात संशोधकांनी सुरुवातीला आफ्रिकेतील जंगलांचे काही भाग पाडत त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.

मागील तीन वर्षांपासून ते याबाबतचा अभ्यास करत आहेत. यात त्यांना असे दिसून आले की झेब्रांची शिकार करण्याचे प्रमाण कमी केले आहे आणि म्हशींची शिकार ते जास्त प्रमाणात करत आहेत.

मात्र यामुळे म्हशींची संख्या कमी झालेली नाही. हे शोधण्याचा त्यांचा प्रवास हा मुंग्यांपर्यंत जाऊन थांबला आहे.

आफ्रिकेतील काही काटेरी झाडांवर कायमच तेथील स्थानिक मुंग्या आढळून येत असे. या मुंग्या या काटेरी झाडांचे संरक्षण करत त्या बदल्यात या मुंग्यांची सुरक्षा ही झाडे करत. त्यांची अंडी या झाडांवर सुरक्षितपणे वाढविली जात.

काटेरी झाडे हे प्रामुख्याने हत्ती किंवा जिराफ यांचे अन्न आहे. हे प्राणी जेव्हा ही झाडे खाण्यासाठी येत त्यावेळी या स्थानिक मुंग्या त्यांचा चावा घेत असे. त्यामुळे ही झाडे टिकून राहण्याचे प्रमाण अधिक होते.

परंतु साधारण दोन दशकांपूर्वी एका बेटावर सापडलेल्या मोठ्या डोक्याच्या मुंग्यांनी मात्र ही पर्यावरणीय साखळी (Environmental cycle) हलवून ठेवली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

(New research in environment)

lion and ant story
Africa Cheetah : आफ्रिकेतील १२ चित्त्यांना भारताची प्रतिक्षा

या मोठ्या डोक्याच्या मुंग्यांनी या जंगलांमधील स्थानिक मुंग्यांना मारायला सुरुवात केली. त्यांची अंडी खाऊन टाकली. तसेच त्यांनी झाडांचे संरक्षण करणे टाळल्यामुळे प्राण्यांनी ही झाडे खाण्यास सुरूवात केली. यामुळे मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे कमी झाली.

याचा अभ्यास करताना संशोधकांनी लिकीपेनिया आणि केनिया येथील जंगलांच्या भूखंडांचा अभ्यास केला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणचा डेटा गोळा करत संगणकीय मॉडेल तयार केले.

त्यातून त्यांना असे दिसून आले की, ज्या ठिकाणी मोठ्या डोक्याच्या मुंग्या नाहीत अशा ठिकाणी सिंहांनी तिप्पट प्रमाणात झेब्रांची शिकार केली आहे. कारण तेथील व्हिजिबिलिटी कमी आहे.

'द गार्डीयन' ला दिलेल्या मुलखातीत प्रा.टॉड पाल्मर म्हणाले, सिंहाला शिकार करण्यासाठी झाडाझुडुपांत लपून राहावे लागते. सावज आल्यानंतर त्याच्यावर झडप घालावी लागते. जर लपण्यासाठी काटेरी झुडुपेच नसतील तर अर्थातच त्या ठिकाणी शिकार करणे अवघड असते.

ज्या ठिकाणी या अश्या मोठ्या डोक्याच्या मुंग्या (ant) आढळून आल्या आहेत तेथील झाडे झुडुपे कमी झाल्याने तेथील व्हिझिबिलिटी जास्त आहे. त्यामुळे तेथे शिकार करणे अवघड आहे. त्यामुळे तिथल्या भागात झेब्रांची शिकार कमी झाली आहे.

अनेक भागांतील डेटाचा अभ्यास करता त्यांना असे आढळून आले की, झेब्रांना (zebra) मारण्याची संख्या कमी झाली असली तरीही म्हशींची शिकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र तरीही अद्याप म्हशींची (buffalo) संख्या कमी झालेली आढळून आलेली नाही.

या विषयातील अभ्यासक म्हणतात या मोठ्या डोक्याच्या आक्रमक असणाऱ्या मुंग्यांमुळे नैसर्गिक अधिवासात, पर्यावरणीय साखळीत मोठे बदल होत आहेत. अजूनही त्याचे मोठे परिणाम समोर आलेले नाहीत, मात्र भविष्यात याचे परिणाम पाहायला मिळतील.

---------

(Latest Marathi news about African countries)

lion and ant story
Wildlife Safari: ह्या पावसाळ्यात अनुभवा कर्नाटकातील वाइल्डलाईफ सफारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.