पुणे : नोकरीनिमित्त मुंबईत राहणाऱ्या ३० वर्षांच्या विशाखाची सात महिन्यांपूर्वी एका तरुणाशी ओळख झाली. भेटीगाठी वाढल्या, त्या मुलाने विशाखाला लग्नाची मागणी घातली. विशाखाला तो मुलगा आवडत होता, पण लग्न करावं की नाही या संभ्रमात ती होती. मुलगा समाधानकारक कमवत होता, कुटुंबीय चांगले होते पण लग्नापर्यंत एवढ्या लवकर निर्णय घ्यावा का, त्याला समजून घेणं आणि आपण त्या मुलासाठी नेमकं काय Feel करतो हे जाणून घेण्यासाठी आणखी चार ते पाच महिने द्यावेत का असे विचार सुरू होते.
मुलगा एवढा उत्साही की एकदा विशाखाच्या गावी पोहोचला आणि तिच्या कुटुंबीयांनाही विशाखाशी लग्न करायचंय असं सांगितलं. विशाखासाठी हे सगळं वाऱ्याच्या वेगासारखं सुरू होतं. चांगले स्थळ आल्याच्या आनंदात विशाखाच्या कुटुंबीयांनी थेट लग्नाची तयारी सुरू केली.
साखरपुडा आणि अवघ्या दीड महिन्यात लग्नाची तारीख ठरली. लग्नमांडवात मैत्रिणीशी एकांतात बोलताना विशाखा म्हणाली, मी अजूनही मानसिकदृष्ट्या तयार नाही. आईवडिलांचा आग्रह आणि मुलाची इच्छा यापायी मी मांडवात उभी राहणारे. लग्नाची तयारीही मी केली नव्हती, कपडे- दागिन्यांच्या खरेदीला मी फक्त शरीराने उपस्थित होते , माझ्या मनाने ग्रीन सिग्नल दिला नव्हता, असं सांगून ती लग्नविधीसाठी स्टेजवर निघून गेली....
विशाखासोबत जे सुरू होतं ते नेमकं काय होतं? त्याला Relationship Escalator म्हणता येईल का?