Bhai Lang : दोन भारतीय इंजीनिअर्संनी मिळून तयार केली नवी प्रोग्रामिंग भाषा
आपण ज्या भाषेत बोलतो, त्या भाषेत संगणकाला सूचना केल्या तर त्याचा काही फायदा होणार नाही.
संगणकाशी संवाद साधायचा असला किंवा एखाद्या कामासंबंधीची सूचना द्यायची असेल तर ती विशिष्ट पद्धतीने द्यावी लागते. आपण ज्या भाषेत बोलतो, त्या भाषेत संगणकाला सूचना केल्या तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण आपण बोलते तशा सूचना संगणकाला केल्या आणि त्या त्याने ऐकल्या तर ? किंवा हिंदीतील काही शब्दांच्या आधारे सूचना दिल्या आणि त्या संगणकाने पाळल्या तर? अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य झाली आहे अनिकेत सिंह आणि ऋषभ त्रिपाठी या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या प्रयत्नांमुळे.एचटीएमएल, सीएसएस, जावा, जावास्क्रीप्ट, सी प्लस प्लस, पायथॉन .... अशांच्या पाठोपाठ आता संगणक प्रोग्रॅमिंगसाठीची नवी भाषा अस्तित्वात आली आहे. जावास्क्रीप्टवर आधआरीत असलेली ही भाषा ऋषभ त्रिपाठी आणि अनिकेत सिंह यांनी विकसित केली आहे. ऋषभ त्रिपाठी ग्रो या कंपनीत तर अनिकेत अॅमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.