मुंबई : नोकरीसाठी एखाद्या देशात जाणे आणि तिथे स्थायिक होणे हा वाटतो तितका सोपा प्रवास नाही.. याची प्रचिती पुन्हा एकदा भारतीय तरुणांना आली आहे. कॅनडात कामासाठी गेलेल्या १ लाख ३० हजार भारतीयांचे वर्क परमिट म्हणजेच कामाचा परवाना संपणार आहे. जर या परवान्याची मुदत वाढवली नाही तर १ लाख ३० हजार तरुण एका रात्रीत बेरोजगार होण्याची भीती आहे. यासाठी काहीच महिन्यांपूर्वी तेथील स्थलांतरित तरुणांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. हा विषय नेमका काय? इतके भारतीय कामासाठी तिथे कसे गेले? कॅनडातील भारतीयांची संख्या किती? तेथे स्थानिक आणि स्थलांतरित असा वाद निर्माण होतोय का? या तरुणांच्या कामाचा परवाना संपण्यामागे काय कारण आहे? कॅनडातील सरकारला धोरण का बदलावे लागत आहे? या सगळ्याबाबत माहिती घेऊया..