पुणे : जपान मध्ये सध्या हिटोरी (Hitori) आणि आणि फुटारी (Futari) हे दोन शब्द चांगलेच गाजतायेत. हिटोरी म्हणजे सिंगल तर फुटारी म्हणजे कपल. पण या दोन शब्दांचा आणि तेथील सरकारचा काय संबंध? तर विषय असा आहे की जपान सरकारने चक्क सरकारी डेटिंग अँप सुरु करण्याचा घाट घातला आहे. या डेटिंग अँपचं नाव आहे 'टोकियो फुटारी स्टोरी (Tokyo Futari Story)'. पण जपान सरकार तेथील नागरिकांची रिलेशनशिप यावर का काम करतंय? जपानी लोकांचं रिलेशनशिपमध्ये असण्याचे किंवा नसण्याचे सरकारी पातळीवर नेमके परिणाम झाले आहेत आणि का? हे सगळं या निमित्ताने जाणून घेऊया