पुणे : स्नेहाने दिवाळसणाला ऑनलाईन ड्रेस घेतले होते; साईजचा विषय असल्याने तिने ते ड्रेस परत पाठवले आणि पैसे Repay चा पर्याय तिने घेतला. तिने मागविले ड्रेस हे कोणत्या छोट्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेतलेले नव्हते तसेच याआधी तिने अनेक वेळा ऑनलाईन शॉपिंग केली होती. त्यामुळे तिला यातल्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या.
तिने Repay ची विनंती टाकली. तिला अपेक्षा होती की काही दिवसांनी हे ड्रेस परत नेले जातील आणि माझे पैसे माझ्या अकाऊंटवर जमा होतील. त्यानुसार ड्रेस घेऊन गेले पण पैसे काही आले नाही. एक दोन दिवस गेल्यावर तिला एका नंबरवरून फोन आला. तिला सांगण्यात आले की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले का चेक करा..
हा फोन तिला ती प्रचंड कामात असताना आला होता. त्यांनी तिला दोन तीन वेळा पैसे आले का हे चेक करण्यास सांगितले. दरम्यान फोन स्वीच ऑफ करा, परत सुरु करा, हे करा, ते करा अशा सूचनांनी ती वैतागली होती.
मग त्यांनी तिला सांगितलं की, तुमच्या कॉम्प्युटरचा ऍक्सेस मला द्या त्यानुसार तिने anydesk या app च्या मदतीने ऍक्सेस दिला आणि क्षणात तिच्या अकाउंट मधून दहा हजार रुपये गेले...