marathi article about office politics positive perspective
मुंबई: ऑफिस पॉलिटिक्स हा तसा न संपणारा विषय. पण तुम्ही तुमच्या पातळीवर जर तो संपवायचा निर्णय घेतला तर कदाचित तो तुमच्यापुरता तरी तितका त्रासदायक राहणार नाही. ऑफिस हे असे ठिकाण आहे जिथे भिन्न स्वभावाची, वेगवेगळा अजेंडा घेऊन, वेगवेगळी पार्श्वभूमी, वेगळ्या गरजा असलेली मंडळी एकत्र येऊन काम करत असतात. त्यामुळे एकमेकांशी संघर्ष होऊन राजकारणाची पार्श्वभूमी तयार होते. अशा ठिकाणी राजकारण हा विषय टाळून पुढे जाणे जवळपास अशक्य असते.
तुम्हाला जर कोणी सांगितलं की कामात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तर तुम्हाला ऑफिस पॉलिटिक्स शिकून घ्यावंच लागेल. तर तुम्ही लगेचच नैतिकतेचा पाढा गात मला हे जमणार नाही त्याऐवजी मी माझं काम चांगल्या रीतीने करेन असे सांगता. कारण मुळातच तुम्हाला वाटू लागतं की पॉलिटिक्स करणे हा तुमचा पिंड नाही. ते तुम्हाला जमणार नाही आणि ते करणं कायमच वाईटच असतं. पण ते तुमच्या चांगल्यासाठीही असू शकतं असा विचार तुम्ही कधी करून पाहिलाय का?