प्रीमियम ग्लोबल
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
अजगराच्या विळख्याप्रमाणेच पृथ्वीला प्लास्टिकचा विळखा पडलेला आहे आणि दिवसेंदिवस तो घट्ट होत चालला आहे. कृत्रिम पदार्थांच्या दुनियेतील प्लास्टिकने बटु वामनाप्रमाणे ही पृथ्वी अवघ्या काही दशकांमध्ये व्यापून टाकलेली आहे
शरद पांडुरंग काळे
भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात रस्त्यांवर दुतर्फा दिसणारे प्लास्टिकचे ढीग अस्वस्थ करून सोडतात. हे ढीग होऊ नयेत यासाठी आपल्याला सुसंस्कृत होण्याची गरज आहे. भाजीवाल्याकडे प्रत्येक भाजीसाठी वेगळी प्लास्टिकची पिशवी मागणारी व्यक्ती ही सुशिक्षित असेल कदाचित, पण ती सुसंस्कृत नसते. बाजारात जाताना स्वतःची कापडी पिशवी नेली तर अशा सुशिक्षित पण असंस्कृत लोकांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसतो...