नवी दिल्ली : इंटरनेटवर काहीही शोधायचं म्हटलं की आपण सहज म्हणतो, गुगलवर बघ ना, गुगलबाबाला विचार. पण तुम्हाला माहितीय का? सर्च इंजिनमध्ये अशाप्रकारची मक्तेदारी स्थापित करण्यासाठी गुगल रग्गड पैसे मोजतं. युनायटेड स्टेट्समधील जिल्हा न्यायाधीशांनी एका खटल्यादरम्यान नेमका यावरच आक्षेप घेतला. सोमवारी ५ ऑगस्ट २०२४ रोजी निर्णय दिला की, गुगलने सर्च इंजिनमध्ये एकाधिकारशाही आणण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. स्पर्धा आणि नवकल्पना रोखण्यासाठी आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा करून घेतला आहे. अमेरिकेतील 'अँटी ट्रस्ट लॉ' चा यामध्ये भंग होत आहे.