Marathi article about Indian Fashion Market
मुंबई : तुम्ही आज जितक्या सहजपणे तुमच्या मैत्रिणीला सांगता की मी Zara ची पर्स घेतली, Gucci चा टॉप घेतला किंवा BIBA, NIKE, ADIDAS हे ब्रँड वापरते तितक्या सहजपणे या इंटरनॅशनल ब्रँडबाबत काही वर्षांपूर्वी बोलू शकत होतात का? हे इंटरनॅशनल ब्रँड आता तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत याचे कारणच मुळी गेल्या काही वर्षात भारतीय फॅशन बाजारपेठेला आलेले चांगले दिवस आहेत.
भारत हा एकुणातच सर्वच बाबतीत जगाच्या पटलावर येण्याचे कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आणि या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला ग्राहकवर्ग.. एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये तरुणांची संख्या कमी होत ज्येष्ठ नागरिक वाढत असताना भारतात मात्र उलट चित्र पाहायला मिळते आहे. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारत हा अर्थातच केंद्रस्थानी आला आहे.
पण खरंच जगाच्या फॅशन बाजारात भारत कुठे आहे? भविष्यात या मार्केटची वाटचाल कशी असेल? आंतरराष्ट्रीय ब्रँडना भारत का हवा आहे? यामागची गणितं काय? जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..