(Marathi Explainer about Indian Onion production, sale and export.)
पुणे : कांद्याचे भाव शंभरी पार गेल्याने घराघरातील ग्राहक चिंतेत आहेत. आता निवडणूका झाल्या.. आता तरी कांद्याचे भाव कमी होतील का? असा प्रश्न घराघरातील मंडळी विचारू लागली आहेत. पण खरोखरच कांदा आणि निवडणुकींचा काही संबंध आहे का? कांदा दरवाढ होण्यामागे हे एकच कारण आहे की यासाठी आणखीही काही कारणे आहेत. शेती पासून सुरुवात होत ग्राहकापर्यंत पोचताना या कांद्याला कसा प्रवास करावा लागतो, यामध्ये शेतकरी आणि ग्राहकांव्यतिरिक्त कोणत्या घटकांचा समावेश असतो आणि कांद्याच्या किमतीवर त्याचा कसा परिणाम होतो.. आता हा वाढलेला कांदा कधी कमी होईल? जाणून घेऊया.