मुंबई: अगं बाई कुठं एवढं डोकं चालवत बसते..? चॅट जीपीटी किंवा गुगल जेमिनी वरून एखादा फॉरमॅट घेऊन त्यात हा कन्टेन्ट टाक.. एकदम भारी CV करून मिळेल तुला.. काही चुका देखील होणार नाही.
असा सल्ला तुम्ही कोणाला किंवा कोणी तुम्हाला देत असेल तर मात्र थांबा आणि थोडा विचार कराच..
कारण नुकतंच एका सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे की, ८० टक्के एचआर किंवा हायरिंग मॅनेजर्सना आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केलेला कन्टेन्ट आवडत नाही.
पण मग 'आर्टीफिफिशियल इंटेलिजन्स' वापरायचंच नाही का? त्याची मदतच घ्यायची नाही का? तर असं अजिबातच नाही.. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करतं आणि त्यातही नाविन्यता कशी आणायची हे पाहणे मात्र आवश्यक आहे.
या 'सकाळ प्लस' च्या लेखाच्या माध्यमातून आपण हायरिंग मॅनेजर्सना नेमके काय खटकतं? ते CV ची निवड कशी करतात? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना नेमकी काय काळजी घ्यावी? आणि तुमचा CV सर्वांपेक्षा वेगळा ठरण्यासाठी काय करायला हवे याची माहिती घेऊया.