Global warming News in marathi
मुंबई: ‘ग्लोबल वॉर्मिंग’ चे हळूहळू सुरु झालेले परिणाम आता एकूणच मानवी जीवनाच्या गळ्याशी आले आहेत. शास्त्रज्ञ त्यांच्या परीने हा होणारा विनाश थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जगातील बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ इतक्या वेगाने का वितळू लागला आहे?
आर्क्टिकमधील बर्फ सध्या प्रत्येक दशकात १३ टक्के या वेगाने वितळत आहे. शास्त्रज्ञांनी यावर नवीन संशोधन विकसित केले आहे. त्या माध्यमातून आर्क्टिकमधील बर्फ गोठवणे शक्य होणार असून त्यामुळे बर्फाचा वितळण्याचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकणार आहे.
बर्फ वितळण्याचा हा वेग असाच राहिला तर जगातील अनेक हवामान बदलाच्या परिणामांसह २०३० पर्यंत हा सर्व बर्फ वितळलेला असेल असा इशाराच शास्त्रज्ञ देत आहेत.
शास्त्रज्ञांनी आर्क्टिकविषयी नेमका काय प्रस्ताव ठेवला आहे? त्यांचा हा प्रयत्न इतक्या मोठ्या स्तरावर राबविणे शक्य होईल का? अन्य शास्त्रज्ञांचे याबाबत काय म्हणणे आहे? याचे काही उलट परिणाम पर्यावरणावर होतील का? जाणून घेऊया.