रवी पळसोकर
भारत- चीन संबंध गेली अनेक वर्षे तणावपूर्ण आहेत व वातावरण निवळण्यासाठी ब्रिक्स संघटनेच्या परिषदेच्या निमित्ताने २३ ऑक्टोबरला कझान, रशिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय भेट होणाच्या शक्यतेबद्द्ल शंका होती म्हणून पडद्यामागील चर्चेनंतर चीनने पूर्व लडाखमधील तिढा शिथिल करण्यास आपल्या भूमिकेत तडजोड केली असावी. अखेर २३ ऑक्टोबरला दोन्ही नेते भेटले आणि सीमेवर शांतता ठेवण्यासाठी चर्चा केली, ज्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.