India's first Long-range Hypersonic Missile : भारताच्या संरक्षणसज्जतेला बळ.!

DRDO : भारताच्या संरक्षण सज्जतेच्यादृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशी संरक्षणसज्जता सध्या केवळ अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडे असून आता त्यात भारताचा समावेश झाला आहे.
India's first Long-range Hypersonic Missile
India's first Long-range Hypersonic Missileesakal
Updated on

Marathi Article about India's first Long-range Hypersonic Missile

अजेय लेले

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या वतीने लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारताच्या संरक्षणसज्जतेच्यादृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. लष्कराच्या तीनही दलांसाठी हे क्षेपणास्त्र उपयुक्त ठरणार आहे.

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या वतीने (डीआरडीओ) १६ नोव्हेंबर रोजी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्याजवळील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून, लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे प्रगत लष्करी तंत्रज्ञान असणाऱ्या देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे. भारताच्या संरक्षण सज्जतेच्यादृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशी संरक्षणसज्जता सध्या केवळ अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडे असून आता त्यात भारताचा समावेश झाला आहे.

या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रामध्ये सुमारे दीड हजार किलोमीटरपर्यंत विविध प्रकारचे पेलोड वाहून देण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे हे क्षेपणास्त्र देशाच्या तिन्ही दलांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.