Matrimonial Site Fake Profile Swati Mukund Instagram Video
मुंबई : दिवाळीची लगबग सुरू असताना माझ्या एका फॉलोअरचा मेसेज आला. तो मेसेज वाचून मला धक्काच बसला. एका प्रसिद्ध वधू-वर सूचक संकेतस्थळावर माझा फोटो वापरून प्रोफाईल तयार करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर हे प्रोफाईल 'एलाईट युजर्स' साठीच होते. म्हणजेच समोरच्या व्यक्तीचे प्रोफाईल व्हेरिफाय करणे, तुमच्या आवडीनिवडीनुसार स्थळ सुचवणे अशा सुविधा त्या एलाईट युजर्सना मिळतात. मग माझा फोटो वापरून तयार केलेल्या या प्रोफाईलचं व्हेरिफिकेशन झालं होतं का? ही जबाबदारी कोणाची? इन्स्टाग्रामवर अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या स्वाती यांनी हे प्रश्न उपस्थित केलेत.