नवी दिल्ली: इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअँप यासारख्या कंपन्यांची ‘मदर कंपनी’ असलेल्या मेटा कडून १७ सप्टेंबर २०२४ रोजी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. जगभरातील सर्व टीनएजर म्हणजेच १६ वर्षाखालील किशोरवयीन मुलांना आता त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट पालकांच्या नियंत्रणाखाली वापरावे लागणार आहे.
गेल्या काही काळात किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे अनेकांमध्ये चिंतेचे विकार आणि नैराश्य वाढत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. याविरोधात अमेरिकेत पालकांनी चळवळ सुरु करत मेटासारख्या जाएंट कंपनीला तिच्या धोरणात बदल करण्यास भाग पाडले आहे. पण केवळ पालकांच्या नियंत्रणाखाली अकाउंट आणल्याने हे प्रश्न सुटतील की पालक आणि मुलांमधील विसंवादाला खतपाणी मिळेल? ज्या हेतूने पालकांनी यांच्याविरोधात चळवळ उभारली तो मूळ हेतू सध्या होईल का?
अन्य देशांच्या तुलनेत भारतात हे नवीन बदल स्वीकारणे अवघड ठरू शकते का? आणि का? या सगळ्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.