अशा वेळी मी आणि माझे मित्र पूर्वी डेटिंग अँप वापरायचो. पण हल्ली फसवणुकीचे प्रकार इतके वाढले आहेत, तसेच कोण कुठे कधी कसा अडकवेल याच्या भीतीने आम्ही ते वापरणं बंद केलं आहे.
हल्ली त्यावर देखील खरी उत्तरं देणारी माणसं राहिली नाही हे कळतं त्यामुळे त्या वाटेला जाण्याची इच्छा होत नाही असे स्वराज (नाव बदलले आहे) सांगत होता.
स्वराज २५ वर्षांचा आहे. तो आणि त्याच्यासारखी पिढी आता डेटिंग अँप पासून काहीशी लांब जात असल्याचेच पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतील मात्र अमेरिकेत झालेल्या सर्व्हेक्षणात देखील नव्याने येणारी ही पिढी डेटिंग अँप वापरण्यास फारशी उत्सुक नसल्याचे समोर आले आहे.