दिल्ली : भारताने मोठा गाजावाजा करत भारतातून नोकरीसाठी इस्राईल या देशात पाठविलेले कामगार सध्या एक एक करत भारतात परतू लागले आहेत. खरं तर कुशल कामगार म्हणून गेलेल्या या कामगारांना महिना १ लाख ३० हजाराची नोकरी म्हणजे लॉटरीच होती परंतु तरीही ही नोकरी त्यांनी सोडली.. त्यांच्या बाबतीत असे काय घडले की त्यांना महिनाभराच्या आतच तो देश सोडावा लागला..
इस्राईलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला का? तिथे त्यांना कशी वागणूक मिळाली? मुख्य म्हणजे अशी पार्श्वभूमी असताना देखील भारत सरकार आता महाराष्ट्रातून आणखी दहा हजार कुशल कामगार इस्त्राईलमध्ये पाठविण्याच्या तयारीत आहे, पण या तरुणांचे भविष्य खरोखरच तिथे घडू शकेल का?