अमेरिकेने चंद्रावर पाऊल ठेवलं, तेव्हा भारतीय अवकाश संशोधनाची सुरुवात झाली होती...
एकीकडे नुकतचं स्वातंत्र्य मिळविलेल्या भारतात शिक्षणाच्या पायभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती, आरोग्य, उद्योग, विज्ञान -तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात पायभूत गोष्टींची निर्मिती करण्यावर भर होता. तर दुसरीकडे अमेरिकेने चंद्रावर मानवाला पाठवण्यात यश मिळवलं.तेव्हा भारतीय अवकाश संशोधनाची सुरुवात झाली होती. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि मानवी इतिहासात एक मोठा अध्याय लिहीला गेला. २० जुलै १९६९ साली अपोलो 11 यान चंद्रावर यशस्वीरित्या लॅंड झालं. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, आणि ऐतिहासिक शब्द उच्चारले, That's one small step for man But giant leap for mankind'' सगळं जग लाईव्ह प्रक्षेपणातून या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरलं होतं. जॉन एफ केनेडी यांनी घोषणा केल्यानंतर ७ वर्षांच्या आत अमेरिकेने चंद्रावर यशस्वी मोहिम पार पाडली.