प्रीमियम ग्लोबल
''या गोव्याचे किनाऱ्याव...!'' निळ्या सागरी दुनियेची करु या सफर
गेली दोन वर्ष कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे घर आणि आॅफिस या व्यतिरिक्त कुठेही फिरायला जाता आले नाही. रोजच्या दिनक्रमातून स्वतःसाठी वेळ काढून निवांत ठिकाणी फिरायला जायला प्रत्येकालाच आवडते. पण अनेकदा आवड आणि सवड एकदाच जुळून येते असे होत नाही. अन् दोन्ही जुळून आले तर नेमक फिरायला जायचं कुठे हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. यंदा आम्ही गोव्याला जायचा प्लॅन केला. गोव्यातील निसर्गसौंदर्याबद्दल अनेक नातेवाइक मित्रमंडळी यांच्या कौतुक ऐकले होते. त्यामुळे आता ते निसर्गसौंदर्य आपण स्वतः जावून पाहणार असल्याने एक वेगळाच आनंद मनात निर्माण झाला. अन् अखेर गोवा ट्रीप झाली. यावेळी अनुभवलेले प्रवास व गोव्याच्या संस्कृतीवर प्रकाश टाकणारा लेख...