डॉ. अनिल लचके
मूलभूत आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनाची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे, याची कल्पना नोबेलविजेत्यांच्या संशोधनांवरून येऊ शकते. त्या दृष्टीने पदार्थविज्ञान, वैद्यकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांतील नोबेलविजेत्यांच्या संशोधनाची ही उद्बोधक माहिती.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग असे शब्द नेहमी कानावर पडतात. मशीन लर्निंग हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘हॅन्ड इन हॅन्ड’ जाणारा विषय आहे. दोन्ही विषयांना भावी काळात मोठा वाव आहे.