डॉ.अशोक मोडक
परराष्ट्र धोरणातील एकारलेपण कसे अंगाशी येते, याचा अनुभव नुकताच मालदीवने घेतला. मालदीवला भारताबाबतच्या भूमिकेत बदल करावा लागला. ज्या दोन उपमंत्र्यांनी नरेंद्र मोदींवर अश्लाघ्य टीका केली, त्यांना आम्ही मंत्रिमंडळातून काढले आहे. मालदीव व भारत यांच्यातला मैत्रीचा वृक्ष सतत फुलावा", असे वक्तव्य करुन मुईझ्झूंनी कोलांटउडी मारली.