मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

'मेटा' विरोधात भारतातही आवाज उठविण्याची गरज..?
child mobile addiction
child mobile addictionEsakal
Updated on

" सध्या तर एक पाच वर्षाचा मुलगा आमच्याकडे दाखल झाला आहे, ज्याला व्हिडीओ बघण्याचे इतके ऍडिक्शन झाले आहे की त्याला नजरेला नजर मिळवून बघणे आणि संवाद साधण्यात देखील अडचणी येत आहे.

मुळात त्याला 'ऑटिजम' नाही पण 'व्हिडीओ ऍडिक्शन' मुळे त्याच्यामध्ये ऑटिजमची लक्षणे दिसू लागली आहेत. हे सोशल मीडिया ऍडिक्शन गंभीर असून ज्याप्रमाणे अमेरिकेत याच्यावरील बंदीची मागणी केली गेली आहे त्याप्रमाणे ती भारतातही करायला हवी असे मलाही वाटते.. " असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता अवचट - पुणतांबेकर यांनी 'सकाळ डिजिटलशी' बोलताना व्यक्त केले.

अमेरिकेत मेटा बंदीची मागणी

फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया या अ‍ॅप्समध्ये दिवसेंदिवस येत असणारे नवीन फीचर्स लहान मुलांना अधिक आकर्षित करत आहेत. यामुळे लहान मुलांना याचं व्यसन लागत असल्याचा आरोप अमेरिकेतील कित्येक पालकांनी केला आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी सह 41 राज्यांनी मेटा कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. तब्बल 233 पानांच्या फेडरल तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे, की कंपनी आपल्या फायद्यासाठी हे अ‍ॅप्स अधिक अ‍ॅडिक्टिव्ह बनवत आहे. यामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health)परिणाम होतो आहे.

याचिकेत नेमकं काय म्हंटलंय?

मेटा कंपनी लहान मुलांना आपल्या अ‍ॅपकडे अधिक आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फीचर्स लाँच करत आहे. यावरील कंटेंट अशा प्रकारे सादर केला जातो आहे, ज्यामुळे मुलं दिवसभर त्याच अ‍ॅप्सवर बसून राहतील.

यासाठी कंपनी "कंझ्युमर प्रोटेक्शन' नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळेच मेटा कंपनीविरोधात अमेरिकेतील पालक आक्रमक झाले आहेत.

कंपनीचं काय मत?

सरकारने थेट कोर्टाची पायरी चढल्यामुळे मेटा कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या वापरासाठी कंपनी वेळोवेळी विविध प्रकारचे नियम लागू करत असते. याबाबत अधिक चर्चा करून, तोडगा काढणं शक्य होतं. मात्र सरकारने असं केलं नाही, असं मेटाच्या प्रवक्त्या लिझा क्रेशाँ यांनी म्हटलं आहे.

3D games
3D gamesesakal

मेटा आल्यानंतर नेमके काय बदल झाले?

२०२१ या वर्षात मेटा कंपनीच्या माध्यमातून एक असे व्यासपीठ तयार केले ज्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, थ्रेडस, व्हाट्स अँप, मेसेंजर, मेटा क्वेस्ट अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यातून ही अँप्स इंटरलिंक झाली.

तसेच या मेटा क्वेस्ट च्या माध्यमातून नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यात लहान मुलांच्या अनेक टूडी आणि थ्रीडी गेम्स (2D 3D games) लाँच करण्यात आल्या आहेत.

पुर्वी फेसबुकवर (facebook) केवळ फ्रेंडलिस्ट मधील व्यक्तीच्या पोस्ट दिसत, मात्र आता गेमिंग व्हिडीओ, गेम्स, यू ट्यूब व्हिडीओ, इंस्टाग्राम रील्स, २४ तासासाठी फेसबुक स्टोरीचा पर्याय, मार्केट प्लेस, ग्रुप्स सजेस्टेड पोस्ट, अवतार फीचरच्या माध्यमातून ऍनिमेटेड फोटो असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

यामुळे प्रत्येक व्यक्ती सतत या नवीन गोष्टी पाहण्यात एंगेज राहते. नवीन नवीन फीचर्स वापरून पहाते. भारतात अद्याप हे मेटा क्वेस्ट फारसे परिचित नाही मात्र किशोरवयीन मुलांमध्ये याची क्रेझ वाढताना दिसत आहे.

मेटा क्वेस्ट मध्ये काय आहे?

मेटा क्वेस्टचे उदाहरच द्यायचं झालं तर याची जाहिरातच अशी केली आहे की, एका मुलाच्या हातात एक बंदूकीसारखं यंत्र आहे. त्याने डोळ्याला थ्रीडी गॉगल लावला आहे. आणि गॉगल लावून तो वर्चुअल उडणारे पक्षी मारतो आहे.

तर दुसऱ्या जाहिरातीत एक महिला आपले प्रोजेक्टचे काम हा थ्रीडी गॉगल लावून करते आहे ज्यात तिला विज्ञानातील संकल्पना थ्रीडी स्वरूपात दिसत आहेत. तर तिसऱ्या जाहिरातीत सर्वांनी असे गॉगल लावत एक कॉर्पोरेट मीटिंग सुरु आहे.

3D games
3D games esakal

पुस्तकात वाचवा तर गेममध्ये मारा

या गेम्सच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला मुलांमधील मूळ शिकवणीत विरोधाभास निर्माण होताना दिसतो. एकीकडे पुस्तकांच्या माध्यमातून आपण मुलांना हे शिकवत वाढवत असतो की प्राणी आणि पक्ष्यांवर प्रेम करावे, त्यांना दुखापत होईल असे वागू नये.

आणि दुसरीकडे गेमच्या माध्यमातून हीच मुले प्राण्यांना मारताना दिसतात. जोरजोरात गाडी चालविताना दिसतात. धडाधड बंदुकीने गोळ्या घालताना दिसतात. यामुळे व्हर्चुअल जग आणि खरे जग यात विरोधाभास निर्माण होतो.

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ६७ लाख रुपये घालविले..

मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, मध्ये आमच्याकडे एक मुलगा दाखल झाला होता ज्याने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ६७ लाख रुपये घालविले होते. तासनतास हा मुलगा ऑनलाईन होता. त्यामुळे अर्थातच पैसे हरल्यानंतर त्याची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे ही व्यसने नकळत्या वयात लागू नयेत यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी आहे.

अभ्यास काय सांगतात?

ओईसीडी डेटा (https://www.oecd.org) या संस्थेने २०१८ मध्ये केलेल्या 'डिजिटल युगात लहान मुले आणि तरुणांचे मानसिक आरोग्य' या अभ्यासात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीचा दाखला दिला आहे.

ज्यात किशोरवयीन मुलांना मेसेजच्या माध्यमातून सायबर गुंडगिरीचा अनुभव येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्यात अनेक देशांची आकडेवारी देण्यात आली असून ही आकडेवारी २०१६ च्या दरम्यान १० ते १५ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दीडशे रुग्णांच्या मागे दोन ते तीन इंटरनेट ऍडिक्टेड रुग्ण

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात महिन्याला जर १५० रुग्ण भेट देतात त्यावेळी त्यापैकी दोन ते तीन रुग्ण हे वर्तणुकीतील आजाराशी संबंधित असतात.

त्याचे कारण अनेकदा इंटरनेटचा, सोशल मीडियाचा अधिक वापर हे असते. मुख्य म्हणजे यात अगदी पाच वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांचा सहभाग असतो. तसेच पुरुष आणि स्त्रिया असे दोघांचे प्रमाण जवळपास सारखेच असते.

child mobile addiction
Children Mobile Addiction : मोबाईलच्या वापराने मुले ‘स्वमग्नते’चे शिकार; पालकांचे दुर्लक्ष, बौद्धिक विकास खुंटतोय

हे एडिक्शन कसं तपासलं जातं ?

यासाठी वीस प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली असून ही प्रश्नावली संबंधितांना भरायला दिली जाते. त्यावरून त्यांची इंटरनेट आणि त्याविषयीच्या सवयीची माहिती मिळते. यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ देखील या व्यक्तींशी बोलून अनुमान लावतात. त्यानंतर त्यांना समुपदेशन केले जाते.

शाळा समुपदेशनासाठी बोलावतात तेव्हा..

शाळांनाही जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट, समाजमाध्यमांच्या समस्या जाणवतात त्यावेळी इंटरनेट ऍडिक्शन संदर्भात अनेक शाळा आमच्याकडे येऊन आम्हाला शाळेत समुपदेशपार व्याख्यान देण्याची विनंती करतात.

शाळेत व्याख्यान देताना आम्ही विद्यार्थ्यांना तीन गोष्टी सांगतो. वापर, गैरवापर आणि व्यसन या तीन प्रकार आम्ही त्यांना समजावतो. त्याची उदाहरणे देतो, केस स्टेडी सांगतो असेही मुक्ता पुणतांबेकर यांनी सांगितले.

या सगळ्यापासून तुम्ही स्वतःला आणि मुलांना कसे लांब ठेवाल?

  1. इंटरनेट (internet) वापरणे अपरिहार्य आहे मात्र वेळोवेळी त्याच्या वापराबाबत, गैरवापराबाबत आणि व्यसनाबाबत मुलांशी बोला. त्यांना उदाहरणे देऊन पटवून सांगा.

  2. अगदी लहान मुले तर पालकांचा आरसा असतात. त्यामुळे कामापुरता इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा वापर तुम्ही केला तर मुलेही तितकाच करतील.

  3. मैदानी खेळ, वाचन, गप्पा, फिरायला जाणे अशा सवयी जाणीवपूर्वक मुलांना आणि स्वतःला लावून घ्या.

  4. आपली मुलं घरातच नाही पण बाहेर गेल्यावर गेम्स किंवा सोशल मीडिया पाहत नाही ना याची माहिती ठेवा.

  5. इंटरनेटमुळे वर्तणुकीशी संबंधित काही समस्या जाणवल्या तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या.

--------

child mobile addiction
Mobile Addiction : शहरातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन; ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडियावर जातोय सर्वाधिक वेळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.