मुंबई: मी ऑफिसमध्ये काम करत असताना आम्ही सगळे सहकारी एकत्र काम करत असतो. आम्हाला कामावर फोनवर बोलू दिले जात नाही.
तो आमच्या ऑफिसचा नियम आहे. पण आमच्याकडे इंटर्नल चॅट सिस्टिम आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण त्यावर बोलतो. काम करताना मजा येते. पण अनेकदा ऑफिसच्याच खूप सगळ्या गोष्टी एकाच वेळी सुरु असतात तेव्हा मात्र एक ना धड अशी अवस्था होते.
कधी काम करत करत ट्रेनिंग असते, ऑफिसचे मीटिंग कॉल सतत सुरु असतात, सहकाऱ्यांना काही शंका असल्यास ते विचारत असतात यामुळे लक्ष विचलित होते त्यामुळे अर्थातच हातातलं काम करायला वेळ लागत असल्याचे २८ वर्षीय आयटी क्षेत्रात काम करणारी साधना सांगते.