मी दरवर्षी संकल्पांची यादी करते आणि दुसऱ्याच गोष्टींना प्राधान्य देते.. (New Year Resolution)

चेंज युअर हॅबिट, चेंज युअर लाईफ आणि 'वन हॅबिट अ डे' या पुस्तकाच्या लेखकांनी या पुस्तकांमध्येही याबाबत सविस्तर लिहिले आहे.
meditation
meditationesakal
Updated on

पुणे - मी दरवर्षी पाच गोष्टींची यादी करते आणि या वर्षात या गोष्टी पूर्ण करायच्या असा संकल्प करते. पण प्रत्येक वर्षी माझ्यासमोर नवीनच गोष्टी येऊन उभ्या राहतात आणि माझे संकल्पांचा प्राधान्यक्रम मागे पडतो.

प्रत्येकवेळी वाटतं की हे जास्त महत्वाचं नाही आणि हे नंतर करूया, आता हे अमुक तमुक जास्त महत्वाचं आहे. पण खरे तर त्यावेळी दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. पण ज्याला डेडलाईन नाही त्या गोष्टी होतच नाहीत, फायनान्स कंपनीत नोकरी करणाऱ्या अनुजा कुसुरकर याविषयी सांगत होत्या.

त्या असेही म्हणतात की, मी माझ्या आजूबाजूला माझ्या सारखी संकल्प पूर्ण न करणारी लोकं पहाते तेव्हा मी मनातून सुखावते, कारण मला या कल्पनेने बरं वाटतं की माझ्यासारखे अनेक जण आहेत. मी एकटी नाहीये..

एखादा संकल्प सुरु तर होतो पण तो महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही, ही बाब अनेकांसोबत होते. संकल्प करण्यापेक्षा हल्ली संकल्प न पूर्ण होण्याच्या चर्चा जास्त रंगतात.

ठरवलेले संकल्प पूर्ण करताना त्यात अनेक टप्पे असतात. अनेकदा हे सोडून देण्याची इच्छा होते.. असे का होते?

चेंज युअर हॅबिट, चेंज युअर लाईफ आणि 'वन हॅबिट अ डे' या पुस्तकाच्या लेखकांनी या पुस्तकांमध्ये याबाबत सविस्तर लिहिले आहे. त्यांनी नुकतीच मिंट या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली ज्यात त्यांनी आठ संकल्पनांच्या माध्यमातून संकल्प प्रभावीपणे राबविण्याबाबत सांगितले आहे.

(Latest Marathi Article about New Year Resolution )

तुमच्या दिवसाची सुरुवात आदल्या दिवशीच्या रात्रीपासून सुरु होते

साधारणतः असं समजलं जातं की, तुमच्या दिवसाची सुरुवात ही त्या दिवसाच्या सकाळपासून किंवा तुम्ही ज्यावेळी उठता तेव्हापासून होते आहे. आणि समजा दिवसाची सुरुवातच चुकीची झाली तर दिवस खराब जातो अशीही अनेकांची समज आहे.

पण लेखक सांगतात हे असे नाही, खरे तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही त्या दिवसाच्या आदल्या रात्रीपासून सुरु झालेली असते.

आदली रात्र जर तुम्ही मोबाईल पाहत आणि शोज पाहत खराब करत असाल तर तुमच्या दुसऱ्या दिवसावर अर्थातच याचा परिणाम होणार. म्हणून तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात ही आदल्या रात्रीपासून होण्याची गरज आहे

विचार करणे ही देखील सवयच आहे

आपल्यापैकी अनेक जण याच विचारामध्ये वाढले आहेत की, आपण जी दैनंदिन कामे करतो त्या म्हणजे सवयी आहेत. परंतु मी चांगला माणूस नाही असे स्वतःला वाटून घेणे ही देखील एक सवयच आहे.

तसेच माझ्याकडे जास्त पैसे नाहीत ही विचार करण्याची मानसिकता ही आपल्याला सवयीनेच आलेली आहे. पैसे झाडाला येत नाही, त्यासाठी तुम्हाला पैसे वाचवावे लागतील ही आर्थिक मानसिकता सवयीतूनच तयार झाली आहे.

आपण प्रत्येक गोष्टीकडे संघर्षाच्या मानसिकतेतून पाहतो म्हणून तर या विचारांच्या सवयी लागत नसतील?

(money, Meditation, dieting Resolution )

meditation
Children Mobile Addiction : मोबाईलच्या वापराने मुले ‘स्वमग्नते’चे शिकार; पालकांचे दुर्लक्ष, बौद्धिक विकास खुंटतोय

सहज करता येण्याजोग्या छोट्या सवयींतून सुरुवात करता येऊ शकते

(Daily routine Goal)

आपले रोजचे रुटीन सेट झालेले असताना त्यात एखादी गोष्ट नव्याने स्वीकरणे अवघड होते. खूप मोठे बदल स्वीकरणे कठीण होते कारण आपण ठरवलेल्या रुटीनमध्ये खूप जास्त प्रमाणात बदल करतो आणि टोकाचा बदल स्वीकारण्याची अपेक्षा स्वतःकडून करतो. याची सुरुवात आपण छोट्या गोष्टीतून करू शकतो.

उदाहरणच द्यायचे झाले तर जेव्हा तुम्हाला जड वस्तू उचलायचा व्यायाम करायचा असतो तेव्हा तुम्ही रोज तबला वाजवण्यापासून सुरुवात करू शकता. किंवा डाएट करायचे असल्यास तुम्ही एखाद्याच पदार्थाने त्याची सुरुवात करू शकता किंवा उपवासाने सुरुवात करू शकता. (Diet Resolution)

चांगली किंवा वाईट सवय असा विचार करू नका (Good Habit, Bad Habit)

अमुक एक सवय चांगली आणि अमुक एक वाईट असे सरसकट लेबल न लावता आणि तसा विचार न करता ती सवय तुमच्या आयुष्य पुढे नेण्यासाठी, तुमच्यात बदल घडविण्यासाठी कशी उपयोगी ठरेल याचा विचार करणे अधिक चांगले होईल.

meditation
New Year Skin Care Resolution: नवीन वर्षामध्ये करा त्वचेची काळजी घेण्याचा संकल्प

सवयी या वारशाने येतात

अनेक सवयी या आपल्या अंगभूत असतात असे म्हणण्यास हरकत नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की, काही लोकं फोनवर बोलता बोलता चालताना दिसतात. अनेक गोष्टी या आपल्याला आपल्या जनुकातून प्राप्त झालेल्या असतात.

काही वेळा कुटुंबाच्या सवयी त्या आपल्या सवयी होतात. एखाद्या घरात गोड जास्त खाल्ले जात असेल तर आपसूकच त्या घरातल्या व्यक्तींना गोड खाण्याची आवड असते.

तर एखाद्या घरात व्यायाम केला जात असेल तर त्यांच्या घरातल्या व्यक्तींनाही त्या प्रकारच्या सवयी असतात. त्यामुळे तुमच्या या सवयी तुमच्या पुढच्या पिढीचा दृष्टिकोन देखील घडवू शकतात.

तुमच्या तीन 'की स्टोन' सवयी (Key Stone Habit) कोणत्या ज्यांच्याशी तुम्ही कधीही तडजोड करणार ना?

तुमच्या ज्या काही सवयी असतील त्याची यादी करा आणि त्यातील तीन सवयी अशा ठेवा की, ज्यामध्ये तुम्ही कधीही तडजोड करणार नाही.

या तुमच्या की स्टोन सवयी तुमच्या दैनंदिन आयुष्यवर नियंत्रण ठेवायला तुम्हाला मदत करतात.

meditation
New Year Resolution : नव्या वर्षात नवा संकल्प, पुस्तकांच्या प्रेमात पडा; या टीप्स वाढवतील वाचनाची आवड

कृतज्ञ असण्याची सवय लावा

आपल्यातील अनेक जण हे भविष्यातील चिंतेत जगत असतात. भविष्याबाबत चिंता आणि भीती आपल्या मनात असते. त्यामुळे वर्तमानातील अनेक गोष्टींचा आनंद घेणे राहून जाते.

मात्र जर आपण आपल्याला मिळालेल्या गोष्टींबाबत कृतज्ञ असलो तर त्यावेळी आपल्या मनात भीतीचे विचार येत नाहीत.

कृतज्ञतेची सवय लागल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या घटना शोधण्याची सवय लागते.

सवयीची घाई नकोच

एखाद्या संकल्पाचे सवयीत रूपांतर होण्यासाठी २१ दिवस लागतात, हा व्हायरल झालेला दावा खोटा आहे. एका लेखकाने एका घटनेची माहिती देताना त्या व्यक्तीच्या अनुभवाबद्दल सांगताना २१ दिवसांचा उल्लेख केला होता. कुठल्याही मोठ्या सवयीची सुरुवात ही छोट्या सवयीनं करणेच अधिक योग्य राहील. (21 day change habit)

-----------

meditation
Types Of Meditation : मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मेडिटेशनचे ‘हे’ प्रकार माहित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.