Marathi article about Office politics
‘साधारण चार महिन्यांपूर्वी मी सकाळी ऑफिस गाठले, लॅपटॉपवर राजीनामा टाइप केला आणि वरिष्ठांना ईमेल पाठवून दिला. ईमेल बघितल्यानंतर एचआर आणि मॅनेजरने केबिनमध्ये बोलावलं. ऑफिसमधल्या राजकारणाला कंटाळून मी राजीनामा देतेय, माझ्यावर सतत काम लादलं जातंय, वेळीअवेळी कागदपत्र मागवले जातात, हे माझ्यासोबतच होतंय असं वाटत असल्याचं मी मॅनेजरला सांगितलं’ मुंबईत बॅक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ३४ वर्षांच्या अर्चना सांगत होत्या.
पण खरंच अर्चनाविरोधात राजकारण सुरू होतं का? अचर्नाच्या मनाचा हा खेळ होतं की आणखी काही? हे पर्सेप्शन का तयार होतात? आणि हे मोडून कसं काढायचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा राजीनामा स्वीकारला गेला की नाही?