मुंबई : मी जेव्हा जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग करायचे तेव्हा अनेकदा माझे एक एक मित्र कट होत जात फिरायला जाणंच रद्द व्हायचं. हे एक दोन वेळा झाल्यावर मी ठरवलं की माझी मी एकटी जाणार फिरायला. २९ वर्षीय आरती तुळजापूरे आपल्या सोलो ट्रॅव्हलिंगच्या अनुभवांविषयी सांगत होती.
हल्ली अनेक मेट्रो सिटीमध्ये सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजेच एकट्याने फिरायला जाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. मुले मुली असे दोघेही अशा प्रकारचे सोलो ट्रॅव्हलिंग करणे पसंत करतात; मात्र मेट्रो सिटी मधील मुलींमध्ये सोलो ट्रॅव्हलिंग करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. एका अहवालानुसार सर्वाधिक सोलो ट्रॅव्हलिंग करणाऱ्या मुली या बंगलोर शहरात आहेत.