पर्यटनासाठी आकाशही ठेंगणे
पर्यटनासाठी आकाशही ठेंगणे- Esakal

अवकाशात गुरुत्वकर्षणविहरित स्थिती अनुभवण्याची संधी

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळून भारत ‘सारे जहाँसे अच्छा’ दिसत असल्याचे अभिमानाने सांगितले होते. एकविसाव्या शतकात आता सामान्य नागरिकही अवकाशाला स्पर्श करून येऊ लागले आहेत
Published on

वकाश पर्यटन किंवा व्यावसायिक पातळीवरील अवकाश प्रवासाची संकल्पना आता नवी राहिलेली नाही. व्यक्तिगत मालकीची रॉकेट आणि अवकाशयानाचा वापर करून अमेरिकेचे दोन अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन आणि जेफ बेझोस हे अवकाशात पर्यटक म्हणून फेरी मारून आल्यामुळे गेल्या काही काळात अवकाश पर्यटन चर्चेत आले आहे

विमान (Aeroplane) वातावरणार्पंत जाते. वातावरणाच्या पलीकडे जायचे माणसाचे स्वप्न ४ ऑक्टोबर १९५७ रोजी साकार झाले. रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ अंतराळात यशस्वीरीत्या पाठवून अंतराळ युगाचा (Space Age) प्रारंभ केला. यानंतर अमेरिकेनेही अवकाश संशोधनात भरारी घेतली. अमेरिकेचे (USA) अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर (Moon) पहिले पाऊल टाकून इतिहास रचला. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांनी अंतराळून भारत ‘सारे जहाँसे अच्छा’ दिसत असल्याचे अभिमानाने सांगितले होते. एकविसाव्या शतकात आता सामान्य नागरिकही अवकाशाला स्पर्श करून येऊ लागले आहेत. (Space Travel Enjoy gravity free state)

जगातील सर्वांत धनवान व्यक्ती म्हणजेचे एलॉन मस्क (Elon Musk) यांनी तर मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे ध्येय उरी बाळगत 'स्पेस एक्स' नावाची अवकाश संशोधन कंपनी सुरू केली आहे. या कंपनीकडूनही अनेक हौशी व साहजिकच श्रीमंत पर्यटक अंतराळ सफर करून आले आहेत.

Loading content, please wait...