टाईम मशीन खरंच प्रत्यक्षात येऊ शकतं?
टाईम मशीन खरंच प्रत्यक्षात येऊ शकतं?- Esakal

टाईम मशिन: कवी कल्पना की प्रत्यक्षात उतरु शकणारे वास्तव?

आपण एखादी चूक केली तर पट्कन भूतकाळात ती चूक दुरुस्त करता येईल का? भूतकाळात जाऊन आपले आजचे वर्तमान आणि भविष्य बदलता येईल का? त्यासाठी आपल्याला भूतकाळात किंवा भविष्य काळात घेऊन जाणारे यंत्र तयार करता येईल का? या विचारातून टाइम मशीन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
Published on

हॉलिवूडमध्ये १९८५ ला तयार झालेल्या ‘बॅक टू द फ्युचर’ या चित्रपटानं अनेकांना वेड लावलं होतं. एक शास्त्रज्ञ 'टाइम मशीन' तयार करतो आणि एक मुलगा अपघातानेच त्याचा वापर करतो. या मशीनमुळे तो भूतकाळात जातो. असे टाईम मशीन खरंच शक्य आहे की.....?

या कथेतला तो मुलगा त्याच शहरात असतो, पण हे शहर तीस वर्षांपूर्वीचे असते. शहराचा विकास नुकताच सुरू झालेला असतो. विशेष म्हणजे तो आपल्याच तरुणपणातल्या आई वडिलांना भेटतो. त्यांची भेट घडवून आणून त्याला माहित असलेलं भविष्य (Future) किंवा तो ज्या भविष्य काळातून आला आहे, तो तसाच घडावा यासाठी प्रयत्न करतो. कारण त्यात जर बदल घडला तर त्याचं अस्तित्वच नष्ट होणार असतं. (Time Machine fact or only fiction)

या चित्रपटाचे (Movie) पुढच्या पाच वर्षात आणखी दोन भाग आले. यामध्ये तो भविष्यातही जाऊन आपल्या मुलांना भेटतो. हे तिन्ही भाग लोकांना खूप आवडले. ते आवडण्यामागचं प्रमुख कारण टाइम मशीन बाबत लोकांना असलेली उत्सुकता. असं मशीन खरंच हातात असलं तर काय काय करता येऊ शकतं, याचा कल्पनाविलास करायला लोकांना खूप आवडलं

Loading content, please wait...