तो बलात्कारी.. पण त्याच्यावर सरकारचा ९ कोटींचा खर्च !

२०१८ मध्ये विमानामध्ये गोंधळाचे वातावरण का निर्माण झाले होते?
Yaqoob Ahamad
Yaqoob Ahamadesakal
Updated on

पुणे - त्याने किशोरवयीन मुलीवर बलात्कार केला पण सरकारने मात्र त्याच्या सुरक्षेसाठी जवळपास नऊ कोटींचा खर्च केला. हे विरोधाभासी असलं तरीही मानवाधिकार आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'युनायटेड किंग्डम'मध्ये एका बलात्कार करणाऱ्या व्यक्तीबाबत घडलेली ही सत्य घटना आहे. बलात्कारी व्यक्तीसाठीच्या थेरीपीवर आणि हॉटेलमधील राहण्यावर सरकारचा मोठा खर्च झाला असल्याचे वृत्त आहे.

नेमकी घटना काय?

याकूब अहमद नावाच्या १९ वर्षीय युवकाने १७ वर्षीय युवतीवर युनायटेड किंग्डममध्ये बलात्कार केला. या दरम्यान त्याचे साथीदार देखील याच्या सोबत होते. त्याच्या साथीदारांसह प्रत्येकाला या प्रकरणात जवळपास ९ वर्षाची शिक्षा झाली होती. ही घटना २००७ साली घडली होती. त्यातील एक साथीदार एका घटनेत मरण पावला होता.

कोण आहे याकूब अहमद?

याकूब अहमद हा वयाच्या चौदाव्या वर्षी सोमालिया या देशातून ब्रिटनमध्ये आला होता. २००३ साली त्याला निर्वासित म्हणून संबोधले गेले होते.

पण २००७ मध्ये त्याने १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केला म्हणून त्याला २००८ मध्ये जेलमध्ये जावे लागले होते. २०१५ साली त्याला देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर देखील त्याला मायदेशी पाठविण्यावरून अनेक युक्तिवाद झाले होते.

२००७ मागील वर्षाच्याप्रकरणाचा आता काय संबंध?

याकूबला युके मधून हद्दपार करावे की नाही याबाबत काही व्यक्तींमध्ये मतभेद होते. त्याच्या जीवाला धोका आहे असेही सांगण्यात आले होते. या दरम्यान अनेक न्यायाधीशांपुढे त्याच्या केस संदर्भात युक्तिवाद झाले होते. मात्र गेल्या आठ वर्षांपासून चर्चेत असलेला याकूबला युके मधून हद्दपार करत नुकतेच मायदेशी पाठविण्यात आले आहे.

२०१८ मध्ये विमानामध्ये गोंधळाचे वातावरण का निर्माण झाले होते?

२०१८ साली युकेने अहमदला हद्दपार करत सोमालियाला पाठविले होते. त्यासाठी त्याला विमानाने सोमालियाला पाठविण्यात येत होते. पण विमानातील प्रवाश्यांनी त्याच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून वेगळाच सूर आळवला.

सर्वांना वाटले की, याला याच्या कुटुंबापासून दूर नेलं जातंय म्हणून विमानातील प्रवाश्यांनी त्याला खाली घेऊन जा अशी ओरड केल्याने त्याची हद्दपारी लांबली होती. 'डेली मेल' या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये तो मोठमोठ्याने रडताना दिसत होता, त्यामुळे अनेक प्रवासी भावुक झाले होते.

Yaqoob Ahamad
UK Political Crisis Update : ब्रिटनच्या औटघटकेच्या पंतप्रधान

त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च का करण्यात आला?

मुळात अहमद हा ब्रिटनचा मूळ रहिवासी नव्हता. त्याच्या शिक्षेदरम्यान तो ब्रिटनमधील जेलमध्ये होता. पण त्याच्या शिक्षेनंतर त्याला देशातून काढून त्याच्या देशी जायला सांगावे की देशातच राहून द्यावे याबाबत दावे प्रतिदावे केले जात होते.

या विषयात तज्ज्ञ म्हणून काही पत्रकारांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच याकूबला सरकारी वकील देखील देण्यात आले होते. त्यासाठी त्यांची फी सुद्धा युके सरकार कडून देण्यात येत होती.

तज्ज्ञांच्या तसेच काही विचार गटांच्या मते त्याला पुन्हा त्याच्या देशात पाठविले तर त्याच्या जीवाला काही संघटनांकडून धोका असू शकतो. त्यामुळे त्याची सुरक्षितता हा मुद्दा समोर ठेवत युके सरकारने त्याला पुढचे काही दिवस हॉटेलमध्ये ठेवले.

तसेच त्याच्यावर ज्या थेरपी केल्या यासाठी देखील पैसे मोजले गेले. भारतीय चलनांत हा खर्च साधारण नऊ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. याबाबत 'डेली मेल' त्यांच्या वृत्तात ही माहिती दिली आहे.

Yaqoob Ahamad
UK News: भारतातील व्यक्तीला ब्रिटनमध्ये जन्मठेपेची शिक्षा, धक्कादायक कारण समोर...

या प्रकरणाची एवढी चर्चा का झाली?

२०१८ विमानातील घटनेननंतर याकूबच्या प्रकरणाची खूप चर्चा झाली.सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेकांनी त्याची हद्दपारी रोखण्याबाबत राग व्यक्त केला. तर काहींचा दृष्टिकोन हा भावनिक पाहायला मिळत होता.

याकूबच्या विषयात दोन गटांचे वेगवेगळे दृष्टिकोन होते. काहींच्या मते त्याने शिक्षा भोगली असून त्याला हद्दपार करणे योग्य नाही असे म्हणले होते तर काहींच्या मते त्याला इथे राहण्याचा हक्क नाही असे म्हणले होते.

Yaqoob Ahamad
Rape Case: बलात्काराच्या प्रकरणात 'या' हॉलीवूड अभिनेत्यावरील गुन्हा सिद्ध.. होऊ शकते इतक्या वर्षांची शिक्षा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.