संतोष शिंत्रे
आजवर आपल्याला जगातील वनस्पति/ वृक्षांपैकी ८० टक्केच माहीत आहेत आणि त्यातल्या जवळपास ३८.६ टक्के जाती नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत, हे विदारक सत्य जागतिक जैववैविध्य परिषदेच्या निमित्ताने समोर आलं. भारतातल्या वनस्पतींच्या ५५ हजार तर प्राण्यांच्या एक लाखापेक्षा अधिक जाती ही निदान एक ‘संसाधनात्मक मत्ता’, शक्ती म्हणून राखायला हवी. सरकारनेही आणि समाजानेही.