आषाढ महिना सुरू झाला की मांसाहार प्रेमींच्या मटण-चिकन व मासे विक्री दुकानांसमोर रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. याचे कारण पुढे येणारा ‘श्रावण’ पाळण्याचा अनेकांचा नेम असतो. म्हणजे या महिन्यात मांसाहार वर्ज्य करून शाकाहारावर भर दिला जातो. भारतात अनेक जण मिश्र आहार घेत असले, तरी शाकाहारींची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. आता तर जागतिक पातळीवर ‘व्हेगन’ चळवळ सुरू झाली असून तिची व्याप्ती वाढत आहे