बर्फाचा पाऊस अनुभवायचायं? बॅग भरा अन् चला हिमालयाच्या शिखरांमध्ये

बर्फाचा पाऊस अनुभवायचायं? बॅग भरा अन् चला हिमालयाच्या शिखरांमध्ये

Published on

बर्फात खेळण्यास कोणाला आवडत नाही सांगा ना. प्रत्येकालाच तो हवाहवासाच वाटत असतो. पावसाळ्यात गारांचा पाऊस पडायला लागला की किती बरे वाटते. पण असाच संथ पडणारा बर्फाचा पाऊस तुम्हाला अनुभवायचा आहे का. मग बॅग भरा आणि हिमालयाच्या शिखरांच्या राज्यात निघा. ती तुम्हाला जणू साद घालताहेत.

एप्रिल, मे या उन्हाळ्याच्या महिन्यांत थंड हवेसाठी सर्वजण हिमशिखरांच्या ट्रीपचे प्लॉनिंग करतात. त्यामध्ये आपल्या राज्यात जायचे म्हटले तर महाबळेश्वर, माथेरानची वाट धरतो. बर्फात जायची इच्छा असणारे पर्यटक बद्रीकेदारची तीर्थयात्रा करतात. तर काही कुलू मनाली गाठतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. ऐन हिवाळ्यात तुम्ही म्हणाल बर्फात जायचे तर तुम्हाला लोक तुम्हाला नक्कीच वेड्यात काढतील. पण खरे सांगू का एकदा तरी याच काळात बर्फात फिरण्याचा आनंद अनुभवा. बर्फाच्या मंद पावसाच पावसात फिरण्याचा आनंद काही औरच. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही अनुभूती घेण्याची संधी असते. भले तुम्हाला हिमशिखरांच्या शेवटच्या टोकापर्यंत हिमपातामुळे जाता येत नाही. पण जो काय अनुभव येईल तर शब्दात न सांगता येत नाही. अर्थात तुम्हाला सर्व तयारीनिशी जावे लागेल, हेही तितकेच खरे. या काळात सर्वांत चांगली गोष्ट्र म्हणजे तुम्हाला या काळात गर्दी मिळणार नाही.

देशभरात उत्तराखंड ही देवभूमी म्हणून समजली जाते. चारधाम यात्रा करण्यासाठी देशभरातून भाविक या राज्यात येतात. हरिद्वार, ऋषिकेश ही दोन मोठी तीर्थक्षेत्रे करून भाविक बद्रीनाथ आणि केदारनाथ येथे जातात. या यात्रेच्या ठिकाणी तर पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणी जायला तुम्हाला मर्यादा येतात. कारण या चारधाम यात्रेसाठी आक्टोंबर महिन्यात यात्रा बंद होते. तर एप्रिल महिन्यात पुन्हा खुले केली जाते. तेथील हिमशिखरांमुळे रस्ते बंद असतात. मात्र, फेबुवारी महिन्यात बद्रीनाथ, केदारनाथ ही तीर्थक्षेत्रे बंद असतात. मात्र, तेथील हिमशिखरे तुम्हाला पर्यटनाचा मनमुराद आनंद देतील, यात शंका नाही.

Loading content, please wait...