मुंबई : बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोवर्स हे फेक असल्याची बातमी २०२० मध्ये चांगलीच गाजली होती. The Institute of Contemporary Music Performance (ICMP) ने याबाबतचा दावा केला होता. दीपिकाचे ४८ टक्के तर प्रियांकाचे ४६ टक्के फॉलोवर्स हे फेक असल्याचे यातून समोर आले होते.
लाखोंच्या घरात यांच्या अकाउंटला त्यावेळी फॉलोवर्सची संख्या होती. यावेळी त्यांचे फॉलोवर्स हे त्यामुळे एकुणातच समाज माध्यमांवर जे फोलोवर्स किंवा लाईक्स असतात ते खरे असतात की खोटे याबाबत चर्चा सुरु झाली होती.
२०२४ हे वर्ष भारतासह अनेक देशांमध्ये निवडणुकांचे वर्ष आहे. निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
अर्थातच राजकीय फायद्यासाठी अल्गोरिदम मध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होण्याची शक्यताही त्यामुळेच आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या नावाने आपल्याला इंस्टाग्राम पेजेस, अकाउंट दिसत आहेत ज्यांना काही क्षणभरत हजारोंच्या संख्येने लाईक, कमेंट येतात, त्या पेजचे मोठे फोलोवर्स असतात. हे सगळं येतं कुठून आणि हे का केलं जातं?