मुंबई: राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सरकार आता कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 'डेडिकेटेड ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर' (GCC) उभारण्याच्या तयारीला लागले आहे.
हे 'डेडिकेटेड ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर' (GCC) नेमके काय, महाराष्ट्रात हे सेंटर्स उभे करण्यासाठी सरकार का प्रयत्नशील आहे? हे सेंटर्स उभे केल्यानंतर रोजगार वाढू शकतील का? आणि याचे एकुणातच उदयॊग क्षेत्रावर कसे परिणाम होतील या सर्व गोष्टी थोडक्यात जाणून घेऊया या 'सकाळ प्लस' च्या लेखातून..