मुंबई: ऑफिसमध्ये जवळपास आठ ते दहा तास मी लॅपटॉप समोर असते, घरी गेले तरी मोबाइल हातात असतोच.. त्यामुळेच दिवसेंदिवस माझी मान आणि खांदे खूप जास्त दुखू लागलेत. त्यातच ऑफिसमध्ये एसी सुरु असल्याने संपूर्ण अंग आखडल्यासारखे होते. ऑफिसमध्ये इतकं काम असतं की अधून मधून ब्रेक घ्यायचा ही गोष्ट माहीत असून पण मी करू शकत नाही, असे २४ वर्षीय आयटी क्षेत्रात काम करणारी प्रणिता सांगत होती. प्रणिता म्हणते, एका एका दिवशी तर मान हलविता देखील येत नाही इतकी दुखते.