(How to reduce Productivity Guilt of work explained in Marathi)
पुणे : नोकरदार बायकांकडून दिवाळी साफसफाई आणि फराळाची अपेक्षा करणाऱ्यांना हारतुरे घालून सत्कार करावासा वाटतो.. नेहा तिच्या आईशी फोनवर बोलत होती. इनमीन तीन दिवसाची सुटी मिळाली आहे त्यात मी काय काय करावं..? त्यापॆक्षा सगळं विकत आणलं.. अगदी पोरांचा किल्ला पण म्हंटलं या वर्षी विकतच आणूया.. दिवाळीचा एक दिवस झालाय आता उरलेल्या दोन दिवसात एखादा पिक्चर बघून येणार आणि परवा पूर्ण दिवस आराम करणार आणि मग रोजचं रुटीन सुरु...
असं बोलून तिने आईचा फोन ठेवला आणि व्हाट्स अँप वर लोकांचे स्टेस्टस बघत बसली.. ज्यात तिला कोणी गावी जाऊन सर्वासोबतचे फोटो टाकलेले दिसले.. कोणी दिवाळीच्या फराळाची तयारी करतानाचे.. कोणी किल्ला बनवतानाचे फोटो टाकले होते.. हे फोटो बघून तिला असं झालं की मलाही हे करायचं होतं.. पण मी हे नाही केलं.. माझं काही चुकलं का?
नेहाच्या मनात आता जी भावना येते आहे ती तशी भावना अगदी आपल्याही मनात कोणत्या ना कोणत्या बाबतीत येऊन जाते. आपल्याला खूप काही करून पाहायचं असतं. पण नियोजनाच्या पारड्यात त्याचं वजन पेलवणारं नसतं.. अशावेळी काही काळासाठी आपण उदास होतो.. मनात आपण कुठे कमी पडतोय का हे देखील येऊन जातं...
मानसशास्त्रात यासाठी भावनेसाठी Productivity Guilt संकल्पना वापरली जाते.. हा Productivity Guilt येणं म्हणजे काय? तो का येतो? त्यावर कशी मात करता येईल? या तीन मुद्द्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया यामागचे मानसशास्त्र.. 'सकाळ प्लस' च्या या लेखातून