इटलीत जी ७ शिखर परिषद झाली. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी तिथे दणदणीत हजेरी लावली. अगदी ऋषी सुनाकपासून ते ज्यो बायडेनपर्यंत सगळ्या देशाच्या प्रमुखांना मोदी भेटले. यजमान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर तर छानसा व्हिडीओही त्यांनी केला. या परिषदेत कॅनडाचाही समावेश होता आणि भारत कॅनडामध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनाही भेटले.
एकीकडे हे सगळं सुरू असताना आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि कायदेविश्वात मात्र निराळ्याच घडामोडी सुरू होत्या.
मोदी इटलीहून परत येत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी निखिल गुप्ताच्या अमेरिेकेत प्रत्यार्पणाची बातमी आली. झेक रिपब्लिकने गुप्ता याला अमेरिकी यंत्रणांच्या ताब्यात दिलं. त्यासंदर्भातला व्हिडीओसुद्धा त्यांनी एक्सवर शेअर केलेला आहे.
हा निखिल गुप्ता कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे नाव सध्या गाजतं आहे. निखिल गुप्ताच्या निमित्ताने भारताचाही संबंध निरनिराळ्या प्रकरणात जोडला जातोय. तो नेमका काय आणि कसा आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा...