Sam Altman : चॅट जीपीटी तयार करणाऱ्या 'ओपन एआय'चे सीईओ सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये का गेले?

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (Artificial Intelligence) क्षेत्रात महत्वाच्या घडामोडी
artificial intelligence
artificial intelligence esakal
Updated on

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (Artificial Intelligence) क्षेत्रात मागील दोन दिवसात महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पुढील काळात एआय (AI) क्षेत्रात घडणाऱ्या मोठ्या घडामोडींची ही सुरुवात आहे असे अनेकांचे म्हणणे आहे.

एआय क्षेत्रातील महत्वाची कंपनी असणाऱ्या 'ओपन एआय' चे (Open AI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या संचालक मंडळाकडून तडकाफडकी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कंपनीने 'चॅट जीपीटी' हे महत्वाचे 'एआय फीचर' मागील वर्षी लाँच केले होते. टेक विश्वात प्रतिक्रिया उमटेपर्यंत दोनच दिवसात सॅम ऑल्टमन आणि त्यांचे काही सहकारी हे मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या कंपनीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन टीम मध्ये काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

एकीकडे ओपन एआय या कंपनीत मायक्रोसॉफ्टची ४९ टक्के गुंतवणूक आहे तर दुसरीकडे त्याच कंपनीने काढलेल्या व्यक्तीला मायक्रोसॉफ्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रमुख म्हणून घोषित केले आहे.

यामुळे पुढील काळात एआय क्षेत्रातील कंपन्यांना हा दोन्ही कंपन्या मिळून मोठा स्पर्धक निर्माण करणार की आपापसातील यांचे मतभेद यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कोण आहेत सॅम ऑल्टमन?

सॅम ऑल्टमन म्हणजेच सॅम्युअल हॅरिस ऑल्टमन ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील अत्यंत महत्वाची व्यक्ती मानली जाते. १९८५ साली जन्मलेले ऑल्टमन हे वयाच्या १९ व्या वर्षी 'लुप्ट' या सोशल नेटवर्किंगचे सहसांस्थपक राहिले होते.

२०१५ साली ओपन एआय या कंपनीची ऑल्टमन आणि सहकाऱ्यांनी स्थापना केली. सुरुवातीच्या काळात कंपनी सुरु करण्यासाठी भारतातील 'इन्फोसिस' कंपनीने देखील यांना आर्थिक मदत केली होती. ते या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

त्यांनी 'चॅट जीपीटी' हे महत्वाचे फिचर सुरु केले, ज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठी खळबळ माजवली होती. यांच्याच काळात कंपनीचा व्यवसाय १ बिलियन डॉलर पर्यंत पोहोचला होता.

दोन दिवसांतील नाट्यमय घडामोडी

१८ नोव्हेंबर - सॅम ऑल्टमन यांना बाहेरचा रस्ता

ओपन एआय (चॅट जीपीटी) (Chat GPT) यांनी १८ नोव्हेंबर रोजी एक्सवर पोस्ट करत " 'ओपन एआय' ने आपले नेतृत्व बदलले आहे" हे जाहीर केले.

यात त्यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगची लिंक देत सांगितले की, ओपन एआयचे नेतृत्व आता आमच्या मुख्य तांत्रिक अधिकारी मीरा मुराती करणार करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात आता त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सॅम ऑल्टमन यांनी कंपनी हे कंपनीतून बाहेर पडत आहेत.

१८ नोव्हेंबर - सत्या नडेला काय म्हणाले?

यावर १८ आणि १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान या विषयावर अनेक चर्चा झाल्या. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांनी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात आम्ही अनेक नवीन गोष्टी आणत आहोत. आमचा एआय सोबत अनेक वर्षांचा करार असून आम्ही येत्या काळात मीरा मुरारी आणि त्यांच्या टीम सोबत काम करू असे एक्स वर जाहीर केले.

१८ नोव्हेंबर - ऑल्टमनच्या सहकाऱ्याने निर्णयाबाबत काय सांगितले?

ग्रेग ब्रोकमॅन हे सॅम ऑल्टमन यांचे सहकारी यांनी पोस्ट करत सांगितले की, कंपनीने अचानक व्हिडीओ मिटिंग घेत सॅम ऑल्टमन यांना काढून टाकल्याचे सांगितले. तर सॅम ऑल्टमन यांनी ओपन एआय मधील माझा अनुभव छान होता असे सांगत पुढेही सांगण्यासारखे खूप आहे असे सूचक विधान केले.

२० नोव्हेंबर - सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन हे मायक्रोसॉफ्टमध्ये

आमच्या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन टीमचे नेतृत्व आता सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन आणि सहकाऱ्यांसह करणार आहेत अशी घोषणा सत्या नडेला यांनी २० नोव्हेंबर रोजी केली. परंतु आम्ही आमची ओपन एआयसोबतचा करार कायम ठेवला असून आम्ही भविष्यातही त्यांच्यासोबत काम करणार आहोत असे सांगितले.

सॅम ऑल्टमन यांना काढताना कंपनीच्या संचालक मंडळाने काय म्हटले?

संचालक मंडाळाने त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, ऑल्टमन यांचे संचालक मंडळाशी जे बोलणे होत होते ते आम्हाला प्रामाणिक वाटत नव्हते. ते त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना कमी पडत होते असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.

या कंपनीची २०१५ साली ना नफा तत्वावर स्थापना झाली होती. त्यानंतर २०१९ साली त्यात काही बदल करत भांडवली गुंतवणूक वाढविण्यात आली. परंतु त्यात कंपनीने आपली ध्येय धोरणे बदलली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मानवाला धोका निर्माण करणार नाही हे आमचे पहिल्यापासूनच ध्येय आहे.

artificial intelligence
Microsoft AI Course : जनरेटिव्ह एआय शिकायचंय? मायक्रोसॉफ्टने लाँच केला मोफत कोर्स

कंपनीचे संचालक मंडळ आणि सॅम ऑल्टमन यांच्यात वैचारिक मतभेद ?

कंपनीच्या सुरुवातीच्या काळात समविचारी आणि या विषयातील तज्ज्ञ मंडळींनी मिळून 'ओपन एआय' ही कंपनी सुरु केली होती. कंपनीच्या स्थापनेवेळी ही कंपनी ना नफा तत्वावर काम करणारी कंपनी म्हणून काम करेल असे ठरविण्यात आले होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मानवाला धोका न पोहोचवता प्रगती करेल या विचारावर या कंपनीची मूठ बांधली गेली होती. मात्र कालांतराने यात भांडवली गुंतवणूक आणण्याचा विचार करण्यात आला. मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या कंपंनीने यात ४९ टक्के गुंतवणूक केली.

त्यातच सॅम ऑल्टमन आणि अन्य मंडळी यांच्यात मतभेत झाले त्यामुळे कंपनीकडून यांना काढण्यात आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

स्टीव्ह जॉब्सनंतर टेक विश्वातील दुसरी मोठी घडामोड

मोठ्या आणि महत्वाच्या पदांवरील व्यक्तींना अचानक त्यांचे पद सोडावे लागणे ही पहिलीच घटना नसून या आधी देखील अश्या प्रकारे अँपल या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनाही 1985 मध्ये अशा प्रकारचा सामना करावा लागला होता.

artificial intelligence
Chat GPT : "पुढच्या दोन वर्षांत Google संपेल"; Gmail च्या निर्मात्याची भविष्यवाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.