पुणे : सोने खरेदी आता सामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही असं अनेक जण जरी म्हणत असतील तरी दुकानांमधील गर्दी काहीसे वेगळेच सांगत आहे. १० ग्राम सोन्याची किंमत ७८ हजारांवर गेली असली तरीही २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्ताचा मोह अनेक ग्राहकांना सोडविता येणार नाही असंच दिसतंय.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होऊनही अजूनही ग्राहक सोने खरेदीकडे कसे वळत आहेत? सोन्याच्या भाववाढीमागे कोणत्या जागतिक घडामोडी आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सराफा बाजार या सगळ्यातून ग्राहकांनी सोने खरेदी करावी यासाठी काय शक्कल काढत आहेत जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विश्लेषणातून..