निखिल श्रावगेसौदी अरेबिया हा वर्षानुवर्षे अमेरिकेचा पश्चिम आशियातील खास दोस्त राहिला असून, त्याला डावलून संयुक्त अरब अमिरातीला बहाल करण्यात आलेल्या ‘प्रमुख लष्करी भागीदार’ या दर्जाला सौदी अरेबियाची चीनबरोबर वाढत असलेली जवळीक कारणीभूत मानली जात आहे..संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झाएद यांचा शासकीय अमेरिकी दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर भेटीगाठी आणि करारांसोबतच त्यांची महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.बायडेन यांनी या भेटीत अमिरातीला ''प्रमुख लष्करी भागीदार'' हा विशेष दर्जा दिला आहे. वर्षानुवर्षे सौदी अरेबिया हा अमेरिकेचा पश्चिम आशियातील खास दोस्त राहिला असून, त्याला डावलून अमिरातीला बहाल करण्यात आलेल्या या दर्जाला सौदीची चीनबरोबर वाढत असलेली जवळीक कारणीभूत मानली जात आहे. उघड आणि छुप्या मार्गाने एकमेकांशी स्पर्धा करणारे चीन आणि अमेरिका यांच्यातील या कंगोऱ्याचा पश्चिम आशियाच्या संदर्भात अन्वयार्थ लावणे आवश्यक ठरते..सौदी अरेबियात खणलेल्या विहिरीला १९३८मध्ये पहिल्यांदा तेलाचा पाझर फुटला. तेव्हापासून, काही प्रमुख अपवाद वगळता सौदी आणि अमेरिकेचे संबंध आजतागायत तसे मधुरच राहिले आहेत. सौदी आपल्या मुबलक तेलाच्या पुरवठ्याने अमेरिकेची तेलाची तहान भागवत राहिला आणि अमेरिकेने सौदीचा शेजारी देशांपासून बचाव करत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली. सौदीला केंद्रस्थानी ठेवत अमेरिकेने पश्चिम आशियातील आपले राजकारण साधले आणि अमेरिकेच्या मान्यतेच्या जीवावर सौदीने आपली राजेशाही सुरु ठेवली आहे. २०१६मध्ये अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवल्यानंतरच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाची निवड केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी परराष्ट्रीय धोरणात सौदीला मान दिल्याचे दिसते. त्यांच्यानंतर अध्यक्षपद सांभाळणाऱ्या जो बायडेन आणि सौदीचे संबंध मात्र तितके चांगले नाहीत..ऐंशी वयोमान पार केलेले राजे सलमान हे सौदीचे राजे असले तरीही प्रत्यक्ष कारभार पाहतात, ते त्यांचे पुत्र आणि युवराज मोहम्मद बिन सलमान. अप्रत्यक्षपणे देश चालवणारे बिन सलमान यांच्याशी आपण संभाषण करणार नाही, अशी खूणगाठ बांधलेल्या बायडेन यांनी द्विपक्षीय संबंधांना पहिला तडा दिला. कोविडकाळात कमी झालेल्या मागणीमुळे तेलाला नीचांकी भाव मिळाले होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात वाढलेल्या तेलाच्या मागणीने आधी झालेली तूट भरून काढता येईल असा तेलोत्पादक देशांनी विचार केला. मात्र, अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांवर याचा परिणाम होईल, या अंदाजाने बायडेन यांनी बिन सलमान यांच्यावर तेलाचा उपसा वाढवत भाव स्थिर ठेवायचा दबाव आणला. बिन सलमान ऐकत नाहीत म्हणून बायडेन प्रशासनाने इतर पद्धतींनी त्यांना इशारे दिले. त्याचा उफयोग न झाल्याने अमेरिकी व्यवस्थेने बिन सलमान यांना दूर सारायला सुरुवात केली. अमेरिका याच मार्गाने जाणार, असा कयास बांधलेल्या बिन सलमान यांनी चीनसोबतचा घरोबा वाढवला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि बिन सलमान यांच्या संबंधांमधील ओलावा बायडेन यांच्याबाबतीत दिसत नाही. २०३० पर्यंत तेलावर मदार असलेल्या सौदी अर्थव्यवस्थेचे विविधीकरण करण्याचा बिन सलमान यांचा मानस आहे. त्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी चिनी तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले असून, उभय देशांमध्ये कोट्यवधी डॉलरचे करार झाले आहेत. तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा, पाणी शुद्धीकरण, संरक्षण सामुग्री, पर्यटन असा भरगच्च सहकार करणारा स्पर्धक चीन आणि मित्र सौदी अमेरिकेच्या डोळ्यात खुपणे स्वाभाविक आहे.दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झाएद आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे संबंध वरकरणी चांगले दिसत असले तरी त्यांच्यात सुप्त स्पर्धा सुरू आहे. तेलाच्या पैशाने गबर झालेली ही दोन्ही राष्ट्रे इस्लामी देशांचे नेतृत्व आपल्याकडे कसे राहील, याची तजवीज करताना आढळतात. बिन झाएद हे बिन सलमान यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. त्यांच्या नेतृत्वात अमिरातीने तेलाच्या चौकटीबाहेर जात बाकीच्या क्षेत्रात गुंतवणूक करून त्या देशाची वाटचाल आधुनिकतेकडे नेली आहे..आमिरातीची स्वतंत्र रेघनामवंत कंपन्या, जगभरातील नावाजलेले ब्रँड, फुटबॉल क्लब, पर्यटन, फॉर्मुला वन सारख्या स्पर्धा भरवत अमिरातीने आपली उदारमतवादी प्रतिमा आधीच ठसवली आहे. या उलट सौदी अरेबिया कायम मानवी हक्कांच्या प्रकरणांमध्ये अडकला आहे. वहाबी इस्लामची कट्टरता समाजात राबवताना सौदीत अनेक दहशतवादी टोळ्यांचा उगम झाला आहे. जहाल धार्मिकतेची ही पुटं बाजूला सारून अमिरातीच्या मोकळेपणाच्या जवळपास यायला सौदीला बरीच वर्षे लागतील. त्यासाठी लागणारा संयम बिन सलमान यांच्याकडे दिसत नाही. सौदी राजघराण्यातील बिन सलमान यांनी संपवलेल्या स्पर्धेने त्यांना सौदी सिंहासनापासून फक्त एक पाऊल लांब आणून ठेवले आहे. आपले महत्त्व अरब पट्ट्यात प्रस्थापित करण्याची मनीषा असणाऱ्या बिन सलमान यांना बिन झाएद यांचा जाच वाटतो. बिन झाएदसुद्धा बिन सलमान यांना तोंडावर पाडायला कमी पाहत नाहीत. बिन सलमान यांनी येमेनवर लादलेल्या युद्धास सुरुवातीला पाठिंबा देऊन, नंतर ते अर्धवट अवस्थेत सोडून अमिरातीने आपली स्वतंत्र वैचारिक बैठक असल्याचे दाखवून दिले आहे. सौदीकडे मक्का-मदिनाचे असलेले पालकत्व अमिरातीला खुणावते, तर सौदीला अमिरातीच्या भविष्यवादी चकाकीची आस आहे. हे शीतयुद्ध नेमके हेरून चीन आणि अमेरिकेने अनुक्रमे सौदी आणि अमिरातीच्या महत्त्वाकांक्षेला फुंकर घालत आपले हित साधायचे ठरवले आहे. बिन झाएद यांचा अमेरिकेच्या ''व्हाईट हाऊस''मध्ये झालेला सन्मान तेच दर्शवतो. बायडेन यांनी या भेटीत अमिरातीला ''प्रमुख लष्करी भागीदार'' हा विशेष दर्जा देऊन अत्याधुनिक शस्त्रे, निर्णायक तंत्रज्ञानाचे कवाड उघडले आहे. अमेरिकेने आधी भारत आणि आता अमिराती या फक्त दोन देशांना हा दर्जा दिला आहे.चीनशी घसट वाढवत असलेला सौदी आणि आता जवळपास तितकेच तेलोत्पादन करणारा अमिराती हे दोन वाळवंटीय देश कधी रणांगणात प्रत्यक्षपणे एकमेकांशी दोन हात करतील असे वाटत नाही. त्यांच्यातील सुरु असलेली धुसफूस तेवढी चालूच राहील अशी काळजी बायडेन आणि अमेरिकी व्यवस्थेने घेतली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये कमला हॅरिस अथवा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ते बायडेन यांचीच री ओढत हे धोरण सुरु ठेवतील. थेट युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती यात बरेच अंतर असते. पण, बऱ्याचदा युद्धजन्य परिस्थितीची सतत जाणीव करून देत, दबाव वाढवत नेला तर एखादे राष्ट्र शस्त्रखरेदीचा सपाटा लावते. त्यात अमिराती अथवा सौदीसारखे राक्षसी ऐश्वर्यसंपन्न देश या प्रकाराला बळी पडणार असतील तर शस्त्र निर्यातदार देशांचा त्यासारखा फायदा नाही. पश्चिम आशियातील हे दोन देश आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा करत त्या प्रदेशातील एक एक देश आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात करतील. या स्पर्धेच्या आडून चीन आणि अमेरिका आपले हित निःसंकोचपणे साधतील. मात्र, दोन ताकदवान देशांच्या छुप्या वादात सौदी आणि संयुक्त अरब अमिरातीला फटका बसू शकतो.----------------------