मुंबई: जन्मापासूनच इंटरनेटचे बाळकडू आहे, स्मार्ट फोन आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या जमान्यात शिकायला सुरुवात केली आहे अशी ही पिढी.. ही काळासोबतची पिढी म्हणून यांना गेल्या काही काळात नोकऱ्यांसाठी देखील प्राधान्य मिळत आहे.
मात्र आता एका नवीन सर्व्हेक्षणानुसार ही पिढी नोकरीवर दोन वर्षाहून अधिक काळ राहण्यास नको म्हणतेय आहे. या पिढीला पैश्यांपेक्षा, गलेलठ्ठ पगारापेक्षा देखील वर्क लाईफ बॅलन्स ही गोष्ट जास्त महत्वाची वाटते आहे.
जनरेशन झेड म्हणजे नेमके कोण? ही पिढी नेमका कसा विचार करते? सर्व्हेक्षणाचे आकडे काय सांगतात? भारतातील जनरेशन झेड काय विचार करते? या पिढीला मॅनेजर होणे देखील का नको वाटते आहे? जाणून घेऊया