Hailstorm Climate Change Research: दिवसेंदिवस गारांचा आकार का मोठा होतोय?

Global Science story : भविष्यात याहीपेक्षा मोठ्या गारा पडतील असे शास्त्रज्ञ का सांगतायत?
maharashtra  garpit
maharashtra garpit esakal
Updated on

मुंबई: मागील वर्षी महाराष्ट्रातील नाशिक, वर्धा यवतमाळ या ठिकाणी मोठी गारपीट झालेली पाहायला मिळाली. या गारपिटीत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर पिकांचे अतोनात नुकसान झाले. या काळात पडलेल्या गारांचे आकारही खूप मोठे होते. यामुळे अनेक पक्षांचे जीव गेल्याच्या बातम्याही पाहायला मिळाल्या. पण दिवसेंदिवस या गारपिटीत होणाऱ्या गारांचा आकार एवढा मोठा का होत चाललाय? भविष्यात याहीपेक्षा मोठ्या गारा पडतील असे शास्त्रज्ञ का सांगतायत? या सगळ्यामागे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजसारखे विषय आहेत का? जाणून घेऊया

विज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'नेचर' या जर्नलमध्ये नुकताच एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शोधनिबंधानुसार गेल्या काही वर्षात गारपिटीदरम्यान पडणाऱ्या गारांचा आकार क्लायमेट चेंजमुळे परस्पर विरोधी पाहायला मिळत आहे. २१ ऑगस्ट २०२४ रोजी हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गेल्या काही काळात भारतात आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वेळी यावेळी गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या गारांचे आकार इतके मोठे होते त्यामुळे शेतीपिके निस्तेनाभूत झाली. मात्र हे फक्त भारतात होत नाही तर शास्त्रज्ञांच्या मते हा क्लायमेट चेंजमुळे हा ग्लोबल प्रॉब्लेम झाला आहे. 

या संशोधकांच्या मते, उबदार हवेमुळे गारा वितळण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे  गारपीट कमी प्रमाणात  होत असली तरी मोठ्या गारा पाडण्याचे प्रमाण वाढले आहे.

हा विषय समजून घेण्यासाठी आधी गारा कशा तयार होतात हे समजून घेऊया

आकाशातून पावसाचे थेम्ब खाली पडत असताना त्याला थंड हवा लागून ते गोठले जातात. हे गोठलेले थेम्ब एकमेकांवर आदळून एकत्र येतात आणि त्याची गार तयार होते.

पृथ्वीवर ज्या भागात तापमानवाढ झाली आहे त्या ठिकाणी हवेतील उष्णता वाढल्याने अधिकाधिक वाफेचे कण हे जमिनीवरून वरच्या दिशेला जातात. खालून येणाऱ्या नवीन वाफेच्या कणांनी आधीच हवेतील कण हा अधिक वर फेकला जातो. अशा प्रकारे आकाशात ढगांचे थर तयार होत जातात. त्यांना थंड हवा लागली की हे थर गोठत जातात. अशा प्रकारे वरून खाली आणि खालून वर जात असताना मूळ बर्फाच्या कणावर गोठलेल्या पाण्याचे अनेक थर जमा होतात. हे सतत होऊन  मूळ बर्फाचा कण अधिकाधिक मोठा होतो आणि तो गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचला जातो.

 शास्त्रज्ञांच्या मते साधारण २००० सालापर्यंत पृथ्वीवर होणाऱ्या गारपिटीची व्यवस्थित नोंद ठेवली गेली नाही. मात्र गेल्या दोन तीन वर्षातील गारांच्या आकारांच्या नोंदी या दिवसेंदिवस आधीच्या नोंदीचे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. दिवसेंदिवस या मोठ्या होत असल्याचे आम्हाला लक्षात आले आहे. हवामान बदलामुळे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत हे आम्हाला प्रथमदर्शनी दिसून आले, मात्र यामध्ये अधिक संशोधन होणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान भविष्यात या गारांचा आकार अधिक मोठा होऊ शकतो अशी भीतीही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.