डॉ. रवींद्र उटगीकर
खनिज ऊर्जेमुळे होणाऱ्या जागतिक तापमानवाढीला अटकाव घालण्यासाठी संपूर्ण जग वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत आहे. ऊर्जा संक्रमणाच्या या प्रयत्नांत अणुऊर्जेचा पर्याय पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत आहे. अझरबैजानमध्ये चालू असणाऱ्या जागतिक हवामानबदलविषयक परिषदेच्या निमित्ताने भारतामध्ये विचाराधीन असणाऱ्या या नव्या ऊर्जापर्वावर दृष्टिक्षेप.