डॉ. केशव साठये
देशातील अनेक राज्ये आपापले सांस्कृतिक धोरण अमलात आणत आहेत. काही ते तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे म्हणून सांस्कृतिक धोरण आजही अस्तित्वात नाही. एकूणच शिक्षण आणि संस्कृती ही राज्यकर्त्यांच्या अग्रक्रमात दाखवण्यापुरती असते. संस्कृतीच्या नावाखाली होत असलेला सवंगपणा थांबवायला हवा.