'द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ला इतकं महत्त्व का? कशी झाली याची सुरूवात?
रेकॉर्ड...अर्थात विक्रम. काहीतरी भन्नाट जगावेगळं अफाट करून दाखवण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. आपल्या नावावर एखादा विश्वविक्रम नोंदला जावा, असं अनेकांना वाटतं असतं, त्यातही काहींमध्ये असे सुप्त गुण असतात, त्याची केवळ त्यांना जाणीव होण्याची गरज असते. त्यामुळे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness Book of Records) आपल्या नावावर नोंदला जावा, हे सगळ्यांनाचं वाटत. पण, हा रेकॉर्ड कसा मिळवावा लागतो, रेकॉर्डचं स्वरूप काय असतं, तो मिळाल्यावर काय होत, अनेकजण तो आपल्या नावावर करून घेण्यासाठी का इच्छुक असतात, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखातून मिळणार आहे. (Why is The Guinness Book of Records so important How did it start)
जगात कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या, पण तो व्यक्ती प्रतिभावंत असला पाहिजे, तोच या रेकॉर्डसाठी नाव देऊ शकतो. या रेकॉर्डमुळे जगभर त्याच्या लौकिक वाढेल. यासाठी त्यांना अर्ज करावा लागतो. गिनीज रेकॉर्ड आपल्या नावावर व्हावा, असे अनेकांना वाटतं. मात्र, तेच लोक यात अर्ज करू शकतात, ज्यांचा विक्रम दुसरा कोणी मोडू शकत नाही