Russia-Ukraine युद्धामुळे जगावर अन्नधान्य टंचाईचं संकट
रशियाने गेल्या २४ फेबुवारी २०२२ रोजी युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले अन् साऱ्या युक्रेनमध्ये हाहाकार उडाला. या युद्धाची व्याप्ती केवळ दोन देशांपुरतीच मर्यादित राहिली असली तरी त्याची झळ मात्र साऱ्या जगाला आता चांगलीच बसू लागलेली आहे. युद्धाची ठिणगी पडून आता तब्बल दोन महिने उलटून गेली तरी युद्ध थांबायची लक्षणे दिसत नसल्याने जागतिक नेत्यांची धास्ती वाढली आहे. (World is facing food and food grains scarcity)
हे युद्ध (War) संपण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत. सुरवातीला युद्धाचा फटका केवळ युक्रेनला (Ukraine) बसला. पण या लांबत चाललेल्या युद्धाचे चटके आता तुमच्या - आमच्या घरापर्यंत जाणवू लागले आहेत. युद्धाचे परिणाम आता थेट स्वयंपाकघरापर्यत पोहोचले आहेत. हे युद्ध आणखी लांबल्यास जगभर अन्नधान्याची (Food Grains) भीषण टंचाई होण्याचे संकट निर्माण होण्याचा धोका आता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.