मुंबई: सिकलसेल आजाराने ग्रस्त असणाऱ्या वॉशिंग्टन मधील १२ वर्षीय मुलगा केंड्रिक क्रोमर याने बुधवारी पहिल्यांदाच व्यवसायिकरित्या मान्यता मिळालेल्या 'जेनेटिक थेरपी' घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्याचा आजार बरा होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.
अमेरिकेत सध्या २० हजाराहून अधिक रुग्ण सिकलसेल या आजारासाठी उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. या १२ वर्षाच्या मुलाने सर्वांच्या बऱ्या होण्याच्या आशा पल्ल्ववीत केल्या असून त्याच्या ट्रेंटमेण्टचा हा प्रवास अनेकांसाठी अनेक शक्यता निर्माण करणारा ठरणार आहे. मात्र त्या सोबतच या नव्या तंत्रज्ञानातून काही आव्हाने निर्माण झाल्यास त्याचे परिणाम देखील या मुलाच्या ट्रीटमेंटमधून समोर येणार आहेत.